ज्ञानाचा जणू फुलतोय मळा, घारगावची खोमणेमळा शाळा

By : Polticalface Team ,14-11-2023

ज्ञानाचा जणू फुलतोय मळा, घारगावची खोमणेमळा शाळा                                    
लिंपणगाव ( प्रतिनिधी ) आज ज्ञान हीच संपत्ती बनली आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यालाच जगात किंमत आहे कारण हे स्पर्धेचे युग असून या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी ज्ञान हवेच. म्हणून केवळ ज्ञानदान करणे हेच आपले कर्तव्य न मानता विद्यार्थी व शाळेच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून काम करणारे शिक्षकही आहेत याचाच प्रत्यय श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील जिल्हा परिषदेच्या खोमणेमळा शाळेत येतोय. शाळेच्या प्रवेशद्वारा पासूनच सुंदर झाडे, बोलके वॉल कंपाउंड, ओळीने कुंडीत मांडलेली विविध फुलांची फुलझाडे, स्वच्छ, सुंदर शालेय परिसर पाहून टागोरांच्या शांतीवनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आजूबाजूला झाडे कमी पण शाळापरिसर मात्र वृक्षराजींनी नटलाय. पक्ष्यांचा किलबिलाट आणि मुलांच्या पाढ्यांच्या पाठांतराचा आवाज ऐकून या शाळेत ज्ञानाचा मळाच फुलल्यासारखे वाटते. सुमारे पाच वर्षापूर्वी बापूराव एकनाथ खामकर यांची बदली या शाळेत झाली. याआधीच्या फिरंगाई मळा शाळेतही त्यांनी पटसंख्या वाढवितानाच लोकसहभागातून ती शाळा सुंदर बनवली. प्रशासकीय बदली होऊनही नाराज न होता कर्तव्य भावनेने पहिल्या दिवसापासूनच येथे झपाटून कामाला सुरुवात केली. सकाळी साडेनऊ वाजता प्रज्ञाशोध परीक्षेच्या जादा तासाने या शाळेची सुरुवात होते. शंभर टक्के उपस्थिती असते. चाळीस पर्यंत पाढे मुले अगदी चुटकीसरशी म्हणतात. कोणताही प्रश्न विचारल्यावर लगेच उत्तर तयार असते. विशेष म्हणजे सर्वांची बोटे वर व उत्साहाने उत्तरे देतात. शाळेत विविध उपक्रम मुख्याध्यापक बापूराव खामकर व सहशिक्षिका अनिता कांबळे/माने राबवितात. हस्ताक्षर सुधार प्रकल्प हा पहिला उपक्रम. जानवी पानसरे, कुणाल खोमणे, सिदधी खोमणे, पार्थ खोमणे हे विद्यार्थी या प्रकल्पाचे प्रमुख आहेत. वळणानुसार सराव, तज्ञांचे मार्गदर्शन, बोरु केलेले विविध पेन यासाठी वापरले जातात .त्यामुळे पहिली पासून शाळेतील सर्वांचेच हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर बनले आहे. यासाठी त्यांच्या स्वतंत्र वह्या आहेत. शिक्षक सराव घेतात. त्यानंतर चा उपक्रम झटपट वाचन. प्रज्वल जगताप व ऋतुजा खोमणे या प्रकल्पाचे प्रमुख आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ते सर्व विद्यार्थ्यांचे बाराखडीनुसार वाचन घेतात. यासाठी शिक्षकांनी स्वतः तयार केलेले शब्दकार्ड, वाचनालयातील छोट्या गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन करतात. स्वतंत्र विद्यार्थी वाचनालय असून विद्यार्थी स्वतः नोंदी करून पुस्तके घेतात व वाचन झाल्यावर नोंद करून ठेवून देतात. त्यामुळे सर्वच मुले अगदी सहजपणे वाचन करतात. शिक्षकांनी घेतलेल्या पाठातील घटकांचे स्वयंअध्ययन गटातून विद्यार्थी स्वतः अध्ययन करतात. या शाळेत कार्यानुभव व शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा आयोजित केली जाते. विद्यार्थी व शिक्षक या कार्यशाळेत विविध माती व कागदाचे साहित्य बनवितात. यासाठी त्यांना एनरॉईड स्मार्ट टिव्ही उपलब्ध असून यू ट्यूबवरील विविध व्हिडीओंचा त्यांना याकामी उपयोग होतो. हे साहित्य वर्षभर विद्यार्थी अध्ययनासाठी व शिक्षक पाठातील घटक शिकवताना वापरतात. भरपूर साहित्य दोन्ही वर्गात कार्यानुभव कोपऱ्यात पाहायला मिळते. तसेच प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेत परसबागेतील भाजीपाल्याचा वापर केला जातो. संगितमय परिपाठ, सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा, वैयक्तिक व सामाजिक स्वच्छतेसाठी ग्रामस्वच्छता भियानातून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जाते. विशेष म्हणजे या दोन्ही शिक्षकांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतील मिशन आपुलकी या उपक्रमातून शाळेतील सर्व भौतिक सुविधांसाठी लोकसहभाग उभा करून शाळेला स्वयंपूर्ण बनवले आहे. येथील पालकांनीही त्यासाठी अर्थिक योगदानाबरोबरच श्रमदानही केलेले आहे. येथील दानशूर पालक कै. बापूराव दादासाहेब खोमणे यांनी या शाळेस त्यावेळी सहा गुंठे जागा दान केली. शाळा विकासात त्यांचे योगदान मोलाचेच आहे. या शाळेने केंद्र व तालुकास्तरीय हस्ताक्षर, वेशभूषा सादरीकरण, सांस्कृतीक कार्यक्रमात यश मिळवितानाच राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत तीन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत. शाळेच्या या सर्व विकासात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडूरंग रावसाहेब खोमणे, उपाध्यक्षा सुप्रिया कानिफ खोमणे, माता पालक संघाच्या अध्यक्षा कल्याणी खंडेराव खोमणे, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष अरुण जगताप तसेच गावच्या सरपंच अरुणाताई खोमणे यांचे सहकार्य लाभत आहे. केंद सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले. त्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण व शाळेच्या सर्वांगीण विकासाला महत्व दिले आहे . पण या शाळेत याची प्रत्यक्षात अंमलबजावणीच झाल्याचे पाहायला मिळते. खरंच मुख्याध्यापक बापूराव खामकर व सहशिक्षिका अनिता कांबळे/माने यांच्यासारखे शिक्षक प्रत्येक शाळेला लाभले तर सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत असा ज्ञानाचा मळा फुलायला वेळ लागणार नाही.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.