By : Polticalface Team ,17-11-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १६ नोव्हेंबर २०२३. सराटी अंतरवली येथील मराठा कुणबी आरक्षण कृती संघर्ष समिती व मनोज जरांगे पाटिल यांनी सरसकट मराठा कुणबी आरक्षणाचा लढा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील मौजे वरवंड ता दौंड जिल्हा पुणे येथे दि,१६ नोव्हेंबर २०२३ रोजी मनोज जरांगे पाटिल यांच्या उपस्थितीत जाहीर विराट सभा घेण्यात आली. या वेळी दौंड तालुक्यातील लाखो मराठा समाज एकवटला होता. जरांगे पाटिल बोलताना म्हणाले. संविधानातील ओबीसी आरक्षणामध्ये कुणबी प्रवर्ग समाज घटकांचा समावेश असताना देखील मराठा समाजाला आरक्षणा पासुन वंचित ठेवले. त्यामुळे आमच्या चार पिढ्या नसते नाबुद झाल्या आहेत. मराठा कुणबी समाजाला आरक्षणा पासुन वंचित ठेवणाऱ्यांची नावे सांगा. असा थेट सवाल मनोज जरांगे पाटिल यांनी वरवंड येथील सभेत बोलताना केला आहे.
तसेच मराठ्यांच्या वाट्याचे आरक्षण खाल्ले कुणी ? असा प्रश्न उपस्थित करून येत्या २४ डिसेंबर रोजी सरकारने मराठा कुणबी आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर पिठलं भाकरी घेऊन मुंबईचे विधानभवन पाहायला सर्व मराठा कुणबी समाज आल्या शिवाय राहणार नाही. राज्य सरकारने मात्र स्वच्छता अभियानाची सोय करावी. असा इशारा मनोज जरांगे पाटिल यांनी सरकारला दिला आहे.
वरवंड येथील सभेला येण्यास जरांगे पाटिल यांना उशीर झाला असल्याने मराठा समाज बांधव दीर्घ काळ उन्हात तळपत होता. तर काही झाडाच्या सावलीत बसून होता. या कालावधीत शाहिर घोगरे यांनी डफावर थाप देत पारंपरिक पोवाड्याच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांचे लक्ष वेधले होते.
या प्रसंगी मराठा कुणबी आरक्षण संघर्ष समितीचे सदस्य प्रदिप सोळुंके यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले. ते बोलताना म्हणाले. राज्यात मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले मात्र राजकारणातील कोणत्याही पुढाऱ्याचे नेतृत्व स्वीकारले नाही. आता मराठ्यांनी मनोज जरांगे पाटिल यांचे नेतृत्व स्वीकारले असल्याचे प्रदिप सोळुंके यांनी सांगितले.
राज्य सरकारने मराठा कुणबी आरक्षण संदर्भात बोलायचे असेल तर सगळ्या समोर बोला असा थेट सवाल करुन सरकारची बोलती बंद केली होती. मराठा बांधवांनकडे कुणबी असल्याचा पुरावा असेल तर जात प्रमाणपत्र देऊ असा पवित्रा सरकारने घेतला असल्याने अधिक बिकट परस्तिती निर्माण झाली आहे. जरांगे पाटिलांची भुमिका राज्यातील मराठ्यांना उर्जा देणारी ठरली आहे.
सरकारने सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे. अशी भूमिका मनोज जरांगे पाटिल यांनी घेतली असून. आमचे पूर्वज बापदादे अशिक्षित होते मात्र ते शेतकरी आहेत तसेच निजामशाही काळातील कुणबी असल्याचे ढीगभर महसुली पुरावे सरकारकडे सादर केले असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी दोन्ही हात वर करा ? असे वक्तव्य करताच या प्रसंगी बहुतांश सर्वांनीच हात वर धरले. तसेच आता कुणबी समाजाने हात वर करा. या प्रसंगी उपस्थित मराठा समाजातील अनेक बांधवांची धांदल उडाली होती. शेतकरी आणि कुणबी दोन्ही प्रवर्ग एकाच असल्याचे प्रदिप सोळुंके यांनी उपस्थित समाज बांधवांना सांगितले.
सराटी अंतरवली जालना जिल्ह्यातील सर्व साधारण शेतकरी मनोज जरांगे पाटिल यांनी मराठा कुणबी आरक्षण मिळावे यासाठी सराटी अंतरवली येथे पहिल्या टप्प्यात तंबल १७ दिवस जोरदार उपोषण केले. मात्र सराटी अंतरवली येथील आमरण उपोषण सुरू असताना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हे उपोषण उधळुण लावण्याचा डाव राज्य सरकारच्या अंगलट आला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारने एक महिन्याचा कालावधी मिळावा अशी उपोषणकर्त्यांकडे मागणी केली होती.या अनुषंगाने आरक्षण कृती समितीच्या वतीने मनोज जरांगे पाटिल यांनी एक महिना व १० दिवसाची मुदत दिली होती. कुणबी असल्याचा पुरावा असेल त्यालाच मराठा कुणबी प्रवर्गाचे (जातीचे) प्रमाणपत्र देण्यात येईल अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटिल यांनी निजामशाही कालखंडातील कुणबी असल्याचे ढीगभर महसुली पुरावे सरकारकडे सादर केले आहेत. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आता आमचा आंत पाहु नका. २५ डिसेंबर रोजी सर्वांनमते अंतीम निर्णय घेतला जाईल तोपर्यंत समाज बांधवांना सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक