मराठा आरक्षणासाठी एक डिसेंबर पासून मराठी बांधवांनी साखळी उपोषणाची तयारी ठेवावी, शेकोटीच्या जाळासमोर बसून मराठा आंदोलन आरक्षणासाठी लढा देत आहे हे पहिल्यांदाच वांगीत पाहिले- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील

By : Polticalface Team ,17-11-2023

मराठा आरक्षणासाठी एक डिसेंबर पासून मराठी बांधवांनी साखळी उपोषणाची तयारी ठेवावी, शेकोटीच्या जाळासमोर बसून मराठा आंदोलन आरक्षणासाठी लढा देत आहे हे पहिल्यांदाच वांगीत पाहिले- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील जेऊर प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी आमचा लढा हा चालूच राहणार असून येत्या एक डिसेंबर पासून मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषणासाठी तयारी करावी असे आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी वांगी येथे बोलताना आपले मत व्यक्त केले करमाळा तालुक्यातील वांगीची सभा ही शेकोटी करून केलेली सभा मी आयुष्यात कधीही पहिली नाही व ही सभा मी कधीच विसरू शकत नाही शेकोटीचा जाळ लावून त्या जाळासमोर आरक्षणासाठी लढा देत आहेत हे मी पहिल्यांदाच पाहिले आहे त्यामुळे आता माघार नाही असे मत मराठा आंदोलन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी वांगी नंबर एक तालुका करमाळा येथे झालेल्या सभेत दिनांक 16 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आपले मत बोलताना व्यक्त केले याबाबत पुढे बोलताना श्री जरांगे पाटील म्हणाले की आम्हाला यायला उशीर झाला परंतु प्रत्येक गावात लोक अडवायला लागले प्रत्येक गाव अडवतोय हे तुम्ही टीव्ही चॅनलला पाहिले असेल प्रत्यक्षात आमच्या गाडीला मराठा बांधव आडवा झोपत होता त्यामुळे तुमच्यापर्यंत यायला आम्हाला उशीर झाला परंतु कितीही उशीर झाला तरी आम्ही सभेला येऊ असा शब्द दिला होता सभेला किती लोक आहेत हे पहात नाहीत गर्दी झाली तर सभा झाली असे नाही याची मला खात्री आहे शेकोटी करून केलेली सभा ही मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली आहे आता हा लढा थांबता कामा नये असे त्यांनी यावेळी बोलताना आपले मत व्यक्त केले
वांगी नंबर एक येथे सकल मराठा समाजाचे वतीने 171 एकरावर सभेचे भव्यदिव्य नियोजन करण्यात आले होते आलेल्या लोकांना 35000 पाणी बॉटल ची वाटप तसेच लाडू चिवड्याचे पाकीटही लोकांना देण्याची व्यवस्था करण्यात आली होती 35 एकर वर भव्य वाहनासाठी वाहनाची पार्किंगची सोय करण्यात आली असून जागोजागी गावापासून पास किलोमीटरच्या परिसरात भगवे झेंडे लाईटची व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे चे व्यवस्था करण्यात आली होती यास सभा शांततेत पार पाडण्यासाठी करमाळ्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी पोलीस प्रशासनाचा वतीने चूक बंदोबस्त ठेवला होता मराठा आरक्षणासाठी सदरचा आमचा हा लढा अविरतपणे चालू असून येथे एक डिसेंबर पासून मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषणासाठी तयारी ठेवावी असेही जरांगे पाटील यांनी बोलताना सांगितले
मराठा आरक्षणाच्या या सभा नियोजनामध्ये सकल मराठा जातीबरोबरच सर्व जाती-धर्माच्या लोकांनी सहकार्य करून सभा नियोजनाच्या ठिकाणी परिश्रम घेऊन आपले योगदान दिले आहे याप्रसंगी हजारो मराठा बांधव या मैदानावर रात्रीच्या थंडीत उपस्थित होते सदरची सभा व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी सकल मराठा समाज वांगी तसेच करमाळा येथील बांधवांनी मोठे परिश्रम घेतले
मुस्लिम समाजाचा असा एक मदतीचा हात करमाळा वांगी मार्गावर देवळाली येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वांगी येथील सभेला जाण्यासाठी निघालेल्या सकल मराठा समाज बांधवांसाठी देवळाली येथील सकल मुस्लिम बांधवांनी मराठा समाजाच्या बांधवांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी