करमाळा तालुका झाला सर्वच बाबतीत पोरका ना लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष ना खासदाराचे, दाद कोणाकडे मागावी सर्वसामान्य नागरिक मात्र पुरता हैरान
By : Polticalface Team ,26-11-2023
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका सध्या सर्वच बाबतीत पोरका झाला असून यामुळे सर्वसामान्य नागरिक पुरता हैराण झाला आहे तालुक्याचे लोकप्रतिनिधी मात्र नाममात्राला असून ते फक्त आठ दिवसाला करमाळा येथे येतात तर गेली आठ महिन्यापासून तहसीलदार पद रिक्त आहे याशिवाय पंचायत समिती मधील गटविकास अधिकारी हे तीन तीन महिन्यापासून रजेवर जातात याशिवाय करमाळा शहरातील नगरपालिकेवर प्रशासक आहे या ठिकाणी अद्यापही मुख्याधिकारी नाही या सर्वच बाबतीत तक्रार कोणाकडे करावी अशी द्विधा परिस्थिती करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांची झाली आहे
करमाळा तालुक्यातील अनेक गावे पाणी टंचाईने त्रासली असून अनेक ठिकाणी मुक्या जनावरांसाठी छावणी नाही पाणीटंचाई तसेच छावणी हे फक्त कागदोपत्री आहे मात्र वस्तूची अद्यापही जनावरांना छावणी तसेच पाणीटंचाई बाबत लोकप्रतिनिधीने ठोस असे काहीही पर्याय शोधले नाही म्हणजेच तालुक्यातील लोकप्रतिनिधी हे फक्त असून अडचण नसून खोळंबा अशा पद्धतीने सदरच्या लोकप्रतिनिधीचे करमाळा शहर व तालुक्याकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष होत आहे सदरचे लोकप्रतिनिधी हे फक्त करमाळा शहरातील त्यांच्या कार्यालयात फक्त आठ दिवसाला येतात तर बाकी दिवशी ते करमाळा तालुक्यातील सुजाण नागरिकांना निमगाव येथे बोलवितात लोकप्रतिनिधीचे काम म्हणजे फक्त पोपटपंची असून अद्यापही लोकप्रतिनिधीने तालुक्यातील पाणीटंचाई तसेच रस्त्याच्या प्रश्नाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असल्याचे पहावयास मिळत आहे लोकप्रतिनिधी फक्त कागदी पत्रे नाचण्यात दंग असून सध्या तरी लोकप्रतिनिधीच्या कामाला शहर व तालुक्यातील जनता पूर्ण वैतागली आहे
तहसील आवारात दलालाचा सुळसुळाट
करमाळा तहसील आवाराच्या प्रांगणात सध्या दलालांचा वाढता सुळसुळाट झाला असून अनेक दलाल मी तुमचे कामे करतो अशी बतावणी करून अनेक दलाल सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहे यामध्ये विविध पक्षाचे कार्यकर्ते असतात सर्वसामान्य नागरिक देखील आपले कामे लवकर होईल या अशा पायी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जवळ घेऊन वेळप्रसंगी त्यांना पैसे देऊन आपले कामे करीत असल्याचे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात दिसून येत आहे या मोकाट फिरणाऱ्या दलालांना वेळीच पोलीस प्रशासनाने तसेच तहसील कार्यालयाने वेळेस आवर घालावा अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्ग तसेच सामान्य नागरिकांमधून होत आहे
याशिवाय करमाळा तालुक्यातील महसूल प्रशासनातील महत्त्वाचा घटक म्हणजे तहसीलदार हे पद होय तहसीलदार हे पद केवळ लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे अद्यापही गेली आठ महिन्यापासून रिक्त असून यामुळे सर्वसामान्यांची अनेक कामे होत नाही सदरचे पद सध्या नायब तहसीलदार हे पहात आहे महसूल प्रशासनातील मुख्य पद तहसीलदार हेच जर रिक्त असेल तर सर्वसामान्यांची शासकीय कामे होणार कशी असा सवाल आज करमाळा तालुक्यातील तमाम जनतेमधून उपस्थित केला जात आहे केवळ राजकीय अभावी सदरचे पद गेली आठ महिन्यापासून रिक्त असून याकडे लोकप्रतिनिधीचे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष होत आहे
याशिवाय करमाळा शहरातील नगरपालिकेमधील मुख्याधिकारी पद हे देखील रिक्त असून या ठिकाणी प्रशासकीय राज असून मुख्याधिकारी नसल्याने करमाळा शहरातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे मुख्याधिकारी नसल्याने याशिवाय प्रशासकीय प्रशासन असल्याने करमाळा शहरातील अनेक कामे यामुळे होत नाही शहरातील आरोग्य यंत्रणा रस्ते मोकाट जनावरे असे विविध प्रश्नांना आज करमाळा शहरातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे मात्र याकडे देखील ही करमाळा तालुक्यातील लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष असल्याचे पहावयास मिळत आहे
तसेच पंचायत समिती मधील गटविकास अधिकारी हे कधीही रजेवर जात असून अनेक वेळा तालुक्यातील नागरिक त्यांना भेटावेस गेले असता ते रजेवर आहेत असे सांगण्यात येते याशिवाय भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे हम करे सो कायदा या पद्धतीने भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी मनमानी पद्धतीने कारभार करतात या परिसरात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बोगस दलालाचा वाढते प्रमाण झाले असून सदरचे दलाल हजारो रुपये घेऊन कामे करताना दिसत आहे सदरच्या भूमी अभिलेख कार्यालय बद्दल शेतकऱ्यांनी वेळोवेळी वरिष्ठांकडे तक्रार करून देखील संबंधित कार्यालयातील कर्मचारी शेतकऱ्यांना वाढता त्रास देऊन हजारो रुपये उकळतात याकडेही लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याऐवजी ते दुर्लक्ष करतात
करमाळा पोलीस खात्याचे तर न बोललेले बरे पोलीस कार्यालयात आलेल्या सर्वसामान्यांच्या तक्रारी कधीही घेतल्या जात नाही उलट साहेब बाहेर गेले आहे नंतर या अशा पद्धतीने पोलीस खात्यातील कर्मचारी शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे देत आहे याशिवाय करमाळा तालुक्यात अनेक घरपोळ्या झाल्या असून अद्यापही आरोपींना अटक करण्याचे धाडस पोलीस खात्याने कधीही दाखविले नाही उलट पक्षी फिर्यादी देण्यात आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दमबाजी करून जात आहे तक्रार देण्यास आले असता कधीही संबंधित पोलीस ठाण्यातील ठाणे आमदार कधीही हजर राहत नाही ठाणे अंमलदार शोधण्यासाठी तक्रार दाराला आपला वेळ खर्ची करावा लागत आहे याशिवाय सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकारी कधीही जागेवर हजर नसतात यामुळे रस्त्यांच्या तक्रारी घेऊन नागरिक सदरच्या ऑफिसमध्ये येतात व हात हलवीत परत जातात तर दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्वच कर्मचारी आपली नेहमीची कामे सोडून दिवसभरात चहा पिण्यात दंग असतात याशिवाय विद्युत मंडळातील कर्मचारी अहवाच्या सव्वा भरमसाठ बिले देऊन सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी आघोरा खेळ खेळत आहे याबाबत तक्रार देण्यास गेले असता संबंधित विज कर्मचारी कधीही जागेवर हजर नसतात फक्त अशा पद्धतीने एक ना अनेक समस्यांना करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे तालुक्यातील नागरिकांना सध्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून सध्या तरी महसूल प्रशासना सहित सर्व प्रशासकीय यंत्रणेवर कोणाचेही अंकुश राहिलेले दिसत नाही
वाचक क्रमांक :