कुणबी चे दाखले मराठा समाजा बरोबर मुस्लीम समाजाला मिळावेत..लियाकत शेख, अध्यक्ष, डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम फौडेशन यांची मागणी

By : Polticalface Team ,30-11-2023

कुणबी चे दाखले मराठा समाजा बरोबर मुस्लीम समाजाला मिळावेत..लियाकत शेख, अध्यक्ष, डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम फौडेशन यांची मागणी करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 कुणबी चे दाखले मराठा समाजा बरोबर कुणबी नोंद असणा-या मुस्लिम बाधंवासह सरसकट मुस्लिम बाधंवाना मिळावेत अशी मागणी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली डाॅ ए पि जे अब्दुल कलाम फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष लियाकत शेख यांनी लेखी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभरात महसुल दफ्तरी तसेच इतर शासकीय दफ्तरात कुणबी दाखले संदर्भात जुन्या नोंदी पाहण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी शिंदे समिती स्थापन केली आहे . शिंदे समितीच्या माध्यमातून जुन्या महसुली नोंदी पाहण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयात तसेच इतरत्र शोध मोहीम चालू आहे. कुणबी पुरावे शोधत असताना निजामकालीन दस्तऐवज किंवा जन्म मृत्यू दाखले, शाळेचे दाखले व इतर महसुली नोंदी मध्ये मराठा समाजाच्या नोंदी बरोबर मुस्लीम समाजातील नागरिकांच्या जुन्या महसुली नोंदी मध्ये कुणबी - मुस्लीम असा उल्लेख असलेल्या नोंदी आढळून आल्या आहेत. त्यामुळे मुस्लीम समाजातील ज्या नागरिकांच्या जुन्या महसुली नोंदी मध्ये कुणबी मुस्लिम नोंदी आढळून आलेल्या आहेत अशांना कुणबी - मराठा नोंदी बरोबर आढळलेल्या कुणबी - मुस्लीम नोंदी असा जातीचा दाखला देण्यात यावा . मुस्लीम समाजातील कुणबीच्या नोंदी ग्राह्य धरुन मुस्लीम समाजाला सरसकट इतर मागासवर्गात समावेश करून न्याय देण्यात यावा व त्यांना मराठा समाजातील बांधवा प्रमाणेच मुस्लीम समाजाला सुद्धा या सर्व सवलती मिळाव्यात. त्यांना सोयी,सुविधा, सवलतीपासून वंचित ठेवु नये अशी मागणी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष लियाकत शेख व सकल मुस्लीम समाजाने महाराष्ट्र राज्य सरकारला लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या निवेदनावर हाजी लियाकत शेख, रमजान बेग, सुरज शेख,समीर शेख, जमीर सय्यद, आझाद शेख, मुस्तकीम पठाण, झिशान कबीर, जहाँगीर बेग, इमत्याज पठाण,फिरोज बेग, राजु बेग,आलीम खान, इसाक शेख, मोहसीन शेख , शाहीद बेग, मुन्ना सय्यद आदि मान्यवर कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
चौकट मुस्लिम समाजातील आतार, मणियार, बागवान, तांबोळी, मुलाणी,कसाब,खाटिक आदी जाती या ओबीसी गटात मोडत आहेत. मात्र या जातीशिवाय खुल्या वर्गात असणारे शेख, सय्यद, पठाण ,काझी, इनामदार आदी जातीचेही मागासलेपण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही संपलेले नाही. या जाती ही मराठा समाजा बरोबरच मागासलेले आहेत. त्यामुळे सरसकट या जातीनाही ओबीसी मध्ये प्राधान्य देऊन त्यांच्या खुला गटातील वर्ग काढून इतर मागासवर्गीत सरसकट समाविष्ट करावे. त्यामुळे या जातीचेही मागासले पण संपुष्टात येईल.शिंदे समितीनेही याचा गांभीर्याने विचार करावा. ... सुरज शेख, सामाजिक कार्यकर्ते, करमाळा

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.