यवत येथील भुलेश्वर स्टिल इंडस्ट्रीयल प्रा.लि.कंपनी व्यवस्थापकाच्या बंगल्या समोर भिक मागो आंदोलन करण्याचा इशारा. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे.संस्थापक अध्यक्ष मा भगवानराव वैराट.
By : Polticalface Team ,30-11-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ३० नोव्हेंबर २०२३ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील भुलेश्वर स्टिल इंडस्ट्रीयल प्रा.लि.कंपनी समोर दि.०१/१२/२०२३ रोजी होणारे उपोषण आंदोलन तूर्तास एक दिवस स्थगीत ठेवण्याचे. कामगार श्री संजीव कुमार आणि संघटनेचे पदअधिकारी कार्यकर्त्यांना सूचना.
व्यवस्थापकाच्या विनंतीवरून बैठकीचे आयोजन. चर्चेतून मार्ग निघावा अशी संघटनेची भुमिका. अंन्यथा भुलेश्वर स्टिल इंडस्ट्रीयल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापकाच्या बंगल्या समोर भिक मागो आंदोलन करण्याचा इशारा झोपडपट्टी सुरक्षा दल व कामगार सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष मा भगवानराव वैराट साहेब यांनी दिला आहे. श्री संजीव कुमार रा यवत आनंदग्राम ता दौंड जिल्हा पुणे यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार असल्याचे झोपडपट्टी सुरक्षा दल व कामगार सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष मा.भगवानराव वैराट साहेब यांनी सांगितल.
यवत येथील भुलेश्वर स्टिल इंडस्ट्रीयल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापकांनी कामगार श्री संजीव कुमार यास दि ०७ जुलै २०२३ रोजी कुठलेही लेखी सुचना अथवा नोटीस न देता कामावरून (कमी केले) घरी बसवले. असल्याने कामगार श्री संजीव कुमार त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांनवर उपासमारीची परस्तीती निर्माण झाली असल्याने श्री संजीव कुमार यांनी दि.१७/११/२०२३ रोजी. मा.अप्पर कामगार आयुक्त सो, शिवाजी नगर पुणे. मा.उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे. तसेच झोपडपट्टी सुरक्षा दल व कामगार सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष मा,भगवानराव वैराट साहेब यांनाही उपोषणाचे लेखी निवेदन देण्यात आले असल्याचे नमूद केले आहे. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा आबासाहेब शिंदे. तसेच मा.दत्ता डाडर. श्री संजीव कुमार. अनिल नागणे. बाबा लोंढे. टिल्लु मानकर आदी झोपडपट्टी सुरक्षा दल व कामगार सुरक्षा दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपोषण स्थळी मंडप उभारण्यासाठी गेले असता.
भुलेश्वर स्टिल इंडस्ट्रीयल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापकाच्या वतीने यवत पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी उपोषण धारकांची उलट सुलट प्रश्न उपस्थित करुन फिरकी घेण्यास सुरुवात केली. पिढीत मजुर कामगार श्री संजीव कुमार हे गेली सहा महिने कंपनी व्यवस्थाप यांच्याकडे कामावर घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र संबंधित व्यवस्था पकांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. शेवटी कामगार कायद्यांच्या अनुषंगाने श्री संजीव कुमार न्याय मिळविण्यासाठी
लोकशाहीच्या मार्गाने उपोषण आंदोलन करण्याचे लेखी निवेदन देऊन इशारा देताच. भुलेश्वर स्टिल इंडस्ट्रीयलचे व्यवस्थापक गडबडले त्यांनी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे. यांचा आधार घेऊन. १ डिसेंबर २०२३ रोजी लोकशाही मार्गाने होणाऱ्या उपोषण आंदोलनाला रोखण्याचा प्रयत्न केला असल्याचे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब शिंदे व दत्ता डाडर तसेच उपोषण करते श्री संजीव कुमार यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी सुरक्षा दल व कामगार सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष मा.भगवानराव वैराट साहेब तसेच राज्य व जिल्हा पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यवत पोलीस स्टेशन येथे उपस्थित झाले. मा भगवानराव वैराट साहेब यांनी यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची भेट घेतली. या दरम्यान झोपडपट्टी सुरक्षा दल व कामगार सुरक्षा दलाचे पदाधिकारी व पोलीस अधिकारी यांच्यात बरीच खडाजंगी झाली. मा भगवानराव वैराट साहेब यांनी या पार्श्वभूमीवर मा अप्पर कामगार आयुक्त सो.शिवाजी नगर पुणे यांच्याशी संपर्क साधला असता या संदर्भात मा अप्पर कामगार आयुक्त कार्यालय शिवाजी नगर पुणे येथे उद्या भुलेश्वर स्टिल इंडस्ट्रीयल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापक व झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष मा भगवानराव वैराट सह पदाधिकारी यांची खलबतं होणार असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र दि ०१ डिसेंबर रोजीचे उपोषण आंदोलन तूर्तास एक दिवस सदर उपोषण आंदोलन स्थगित ठेवण्याच्या सुचना वैराट साहेब यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते व पिढीत श्री संजीव कुमार यांना दिल्या आहेत.
श्री संजीव कुमार यांना न्याय मिळाला नाही तर भुलेश्वर स्टिल इंडस्ट्रीयल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चे व्यवस्था पकाच्या बंगल्या समोर झोपडपट्टी सुरक्षा दलाचे भिक मागो आंदोलन केले जाईल असा इशारा मा भगवानराव वैराट साहेब यांनी दिली आहे. या प्रसंगी नेते भगवानराव वैराट साहेब. राज्य संघटक आबासाहेब चव्हाण. राज्य संघटक प्रतिभा गायकवाड राज्य संघटक सुरेखा भालेराव पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर. जिल्हा अध्यक्ष आबासाहेब शिंदे.अनिल नागणे. बाबा लोंढे. टिल्लु मानकर. अँड सचिन सावंत तसेच
झोपडपट्टी सुरक्षा दल व कामगार सुरक्षा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक :