प्रतीक- प्राची यांचा पारंपारिक पद्धतीने शुभविवाह संपन्न

By : Polticalface Team ,01-12-2023

प्रतीक- प्राची यांचा पारंपारिक पद्धतीने शुभविवाह संपन्न    लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा पंचायत समितीचे सदस्य श्री. जिजाबापू शिंदे यांचे पुतणे व प्रतिक पेट्रोल पंप ढोकराईच्या संचालिका श्रीमती नयनतारा शिंदे यांचे चिरंजीव प्रतीक आणि नारळी तालुका बारामती येथील डॉक्टर पांडुरंग पोमन पाटील यांची सुकन्या प्राची यांचा शुभविवाह नुकताच नेचर नेस्ट ऍग्रो टुरिझम उरुळी कांचन येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.
‌ या शुभविवाह करिता अहमदनगर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष तथा जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, माजी आमदार राहुल दादा जगताप, माजी आमदार श्रीमती रंजनाताई कुल, ज्येष्ठ नेते अरविंद दादा ढमढेरे, महाराष्ट्र मार्केट कमिटीचे चेअरमन बाळासाहेब नहाटा, अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, माजी सभापती बाळासाहेब गिरमकर, नागवडे कारखान्याचे माजी भाई चेअरमन केशव भाऊ मगर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हरिदास आबा शिर्के, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक कांतीलाल होळकर, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे संचालक किरणराव काळे, लक्ष्मणराव नलगे, दिपक पाटील भोसले, राजकुमार पाटील, किसनराव नलगे, ज्ञानेश्वर विखे पाटील, सौ. मनिषाताई मगर यांच्यासह शिक्षण व सांप्रदायिक अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर शुभविवाह संपन्नते करिता चंद्रशेखर शितोळे देशमुख व त्यांच्या पत्नी सौ. योगिनीताई चंद्रशेखर शितोळे देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भाऊसाहेब बांदल यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व पंचायत समितीचे सदस्य जिजाबापू शिंदे यांनी केले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी