सहकार महर्षी नागवडे कारखाना चालू गाळप हंगामाच्या उसाचा पहिला हप्ता 2700 प्र. मे. टना प्रमाणे

By : Polticalface Team ,01-12-2023

सहकार महर्षी नागवडे कारखाना चालू गाळप हंगामाच्या उसाचा पहिला हप्ता 2700 प्र. मे. टना प्रमाणे लिंपणगाव (प्रतिनिधी)- सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ या चालू करीत हंगामात गळीतास आलेल्या उसाचा पहिला हप्ता २७०० रुपये प्र‌ मे. टनाप्रमाणे येत्या चार-पाच दिवसात अदा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिली.
‌ प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना ऊस भावामध्ये आतापर्यंत कधीही मागे राहिलेला नाही. सातत्याने चांगला ऊस भाव देऊन सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताला प्राधान्य दिलेले आहे. त्यानुसार चालू गळीत हंगामात गळीतास आलेल्या उसास रुपये 2700 प्र. मे. टनाप्रमाणे ऊस पेमेंट येत्या चार-पाच दिवसात अदा करण्यात येणार आहे.
‌ नागवडे कारखान्याने दिनांक 30 नोव्हेंबर अखेर एक लाख 14 हजार 590 मे टन उसाचे गाळप केले असून १ लाख ११ हजार १00 क्विंटल साखर पोती उत्पादन केलेले आहे. आजचा साखर उतारा 10.75 असून सरासरी साखर उतारा 9.73 टक्के आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्पही चांगल्या प्रकारे चालू असून आज अखेर 91 लाख 95 हजार 400 युनिट वीज उत्पादित झालेली असून त्यापैकी 56 लाख 73 हजार 600 युनिट वीज एक्सपोर्ट करण्यात आलेली आहे.
‌ ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आजपर्यंत नागवडे कारखान्यावर विश्वास ठेवून पुरवठा केलेल्या उसास सातत्याने चांगला भाव दिलेला आहे . भविष्यातही ऊस भावाबाबत कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये न ठेवता नागवडे सहकारी साखर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस देऊन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस व संचालक मंडळ सदस्य यांनी केले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी