फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक होत नसल्यामुळे तसेच पोलीस प्रशासनाच्या मनमानी कारभारा विरोधात गुळसडी येथील तरुण चार डिसेंबर पासून आमरण उपोषण करणार

By : Polticalface Team ,02-12-2023

फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक होत नसल्यामुळे तसेच पोलीस प्रशासनाच्या मनमानी  कारभारा विरोधात गुळसडी येथील तरुण चार डिसेंबर पासून आमरण उपोषण करणार

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील गुळसडी येथील तरुण सुनील गणपत भोसले हे पोलीस प्रशासनाच्या मनमानी कारभारा विरोधात येत्या 4 डिसेंबर 2023 सोमवारी करमाळा तहसील कचेरीच्या प्रांगणात फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक होत नसल्याच्या कारणामुळे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती श्री भोसले यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे
निवेदनाच्या प्रती श्री भोसले यांनी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवले आहेत जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनात श्री भोसले यांनी पुढे असे म्हटले आहे की मी करमाळा तालुक्यातील मौजे गुळसडी येथील कायमचा रहिवासी असून मौजे पिंपळवाडी तालुका करमाळा येथील राजेंद्र सोपान चव्हाण, सौ कुसुम राजेंद्र चव्हाण, तसेच सिद्धार्थ राजेंद्र चव्हाण, राहुल रामदास कांबळे व आजिनाथ सिताराम चव्हाण या सर्वांनी मिळून माझा विवाह करीना राजेंद्र चव्हाण हिच्याशी करून दिला होता मात्र करीना राजेंद्र चव्हाण हिचे पूर्वीच विवाह झाला होता सदर पहिल्या विवाहाची माहिती माझ्यापासून लपवून ठेवून माझ्याकडून विवाहासाठी तीन लाख रुपये घेऊन माझी फसवणूक उपरोक्त लोकांनी केली आहे त्याबाबत मी रीतसर करमाळा पोलीस स्टेशन येथे एफ आय आर नंबर 0785/2023 ने दिनांक 5 ऑक्टोंबर 2023 रोजी तक्रार दाखल केली आहे परंतु तक्रार दाखल केल्यापासून सदर प्रकरणातील आरोपीवर तब्बल दोन महिने झाले तरीही अद्याप पर्यंत पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही उलट सदर आरोपी राजरोसपणे करमाळा येथे फिरत आहेत यावरून हे स्पष्ट दिसून येत आहे की पोलीस आणि संबंधित आरोपी मध्ये आर्थिक संगणमत झाल्याचे दिसून येत आहे असे निवेदनात म्हटले आहे
सदर आरोपीवर कारवाई करणे बाबत मी पोलीस स्टेशनला विचारण केली असता पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी उलट मलाच म्हणतात की तू आम्हाला सांगू नको काय करायचे ते अन्यथा तुझ्यावरच 498 चा खोटा गुन्हा दाखल करून अटक करू असे सांगून मला हाकलून दिले जात आहे मी सध्या भयभीत वातावरणात जीवन जगत आहे त्यामुळे मला नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तरी सदर वरील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अन्यथा मी सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणास बसणार असल्याचे श्री भोसले यांनी निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे
निवेदनाच्या प्रती अधिक माहितीस्तव मा.मुख्यमंत्री मुंबई, गृहमंत्री मुंबई, मा. जिल्हाधिकारी साहेब सोलापूर,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग करमाळा, तसेच पोलीस निरीक्षक करमाळा आदिना पाठवले आहे

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न