राष्ट्रवादी करमाळा तालुका युवक अध्यक्षपदी अमीर तांबोळी यांची निवड
By : Polticalface Team ,04-12-2023
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी करमाळा येथील उद्योजक अमीर शेठ तांबोळी यांची निवड करण्यात आली त्यांची निवड आज पुणे येथे एका राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन करण्यात आले
नवनिर्वाचित अध्यक्ष हे करमाळा येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक युवा उद्योजक हाजी अल्ताफ
शेठ तांबोळी यांचे चिरंजीव आहे अमीरशेठ तांबोळी यांचे उल्लेखनीय सामाजिक कार्य असून त्यांनी आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविले असून यामध्ये रमजान ईदच्या दिवशी गोरगरीब मुस्लिम बांधवांना रमजान साहित्य वाटप तसेच दिवाळीनिमित्त गोरगरीब गरजूंना फराळाचे वाटप याशिवाय आषाढी एकादशीच्या दिवशी जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत अन्नदान असे विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत आज पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीत अमीर शेठ तांबोळी यांची करमाळा तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल करमाळा शहर तालुक्यातील त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे
राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यावर करमाळा तालुक्यातील युवक राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी दिली आहे ती मी योग्य पद्धतीने व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवण्या कामी पुरेपूर प्रयत्न करेन अशी ग्वाही राष्ट्रवादी करमाळा तालुका युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमीर शेठ तांबोळी यांनी पत्रकारांना बोलताना माहिती दिली