उस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्यां मुकादमावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी युवासेनेचे सोमवारी घंटानाद आंदोलन
By : Polticalface Team ,04-12-2023
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा तालुक्यातील उस वाहतूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या मुकादमावर गुन्हे दाखल करून उस वाहतूकदारांचे पैसे मिळवून द्यावेत या मागणीसाठी युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सोमवार दिनांक ४ डिसेंबर रोजी तहसील व पोलीस कार्यालया समोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिला आहे.
निवेदनात फरतडे यांनी म्हटले की करमाळा तालुक्यासह इतर साखर कारखान्यांना उस पुरवठा करणाऱ्या उस वाहतूक दारांची पुसद,जिंतुर, परभणी,हिंगोली,जालना बीड परळी गेवराई या भागातील मुकादमांनी उस तोड मजूर देतो म्हणून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केलेली आहे
.
सदर उस वाहतूक करणाऱ्या अनेक सुशिक्षित बेरोजगार शेतकरी मुलांनी उसनवारी, व्याजबट्टा तसेच बॅंक कर्ज करून वाहने व टोळ्या करण्यासाठी पैसे गुंतवले आहेत. फसवणूकी मुळे त्यांच्यावर आज आत्महत्येची वेळ आली आहे. या वाहतूकदारांकडे मुकादम उसतोड मजुरांची नोट्री, चेक आधार कार्ड, पैसे देतानाचे व्हिडीओ तसेच बॅंक खात्याचे तपशील उपलब्ध आहेत मात्र पोलीस प्रशासनाकडून योग्य पद्धतीने सहकार्य होत नसल्याने उस वाहतूकदारांना तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागत आहे.
एखादा मुकादम किंवा मजूर यास धरून आणले तर आपल्याच लोकांवर अपहरण, ओलीस ठेवणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होत आहेत हे दुर्दैव आहे.त्यामुळे अशा गुन्ह्यात विशेष पथक तयार करून उस वाहतूक करणाऱ्यांना अभय दिले जावे, त्यांची झालेली फसवणूक व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले जावेत या मागणीसाठी उस वाहतूकदार वाहन मालक यांना सोबत घेऊन सोमवार दिनांक ४ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून फसवणूक झालेल्या उस वाहतुकदार व शेतकऱ्यांनी या अन्याया विरोधात आवाज उठवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित रहावे असे अवहान
युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे शाहूराव फरतडे यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.