ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर हे समाजाभिमुख पत्रकारितेत यशस्वी ठरले- मुख्याध्यापक राजेंद्र कळस्कर

By : Polticalface Team ,04-12-2023

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर हे समाजाभिमुख पत्रकारितेत यशस्वी ठरले- मुख्याध्यापक राजेंद्र कळस्कर
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यात गेल्या पंचवीस वर्षापासून ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी आपल्या पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत असताना विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाभिमुख लिखाण करून दुर्लक्षित समाजाला योग्य वेळी न्याय मिळवून भरीव योगदान दिल्याचे गौरवद्गार श्री हंगेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कळसकर यांनी आयोजित सत्कार समारंभ बोलताना व्यक्त केले.
पत्रकार कुरुमकर यांनी नुकतीच तालुक्यातील सहकार व शिक्षण महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांनी स्थापन केलेल्या श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री हंगेश्वर विद्यालय हंगेवाडी येथे नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान पत्रकार कुरुमकर यांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कळस्कर यांनी सन्मान केला.
यावेळी आपल्या गौरवदगार पर भाषणात मुख्याध्यापक कळस्कर आणखी पुढे म्हणाले की ,जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर हे पत्रकारिता क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातही अगदी प्रामाणिकपणे योगदान देत आहेत. जिथे अन्याय तिथे वृत्तपत्राच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याची भूमिका कुरुमकर यांनी निर्भीडपणे अंगीकारली. त्याचा निश्चितच सर्वसामान्यांना फायदा झाला. कुरुमकर हे निस्वार्थी पत्रकारिता क्षेत्रात अत्यंत शिस्तप्रिय व निर्भीड व्यक्तिमत्व असल्याने त्यांनी नेहमीच तालुका प्रशासनावर आपला अंकुश ठेवला. सिंचन, कृषी, दळणवळण, वीज, रस्ते व शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्नांना त्यांनी वृत्तपत्राचे माध्यमातून प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. दैनंदिन वातावरणातील बदलाबाबतही त्यांनी वेळोवेळी वृत्तपत्राच्या माध्यमातून विचार व्यक्त करून प्रसिद्धी देऊन शेतकऱ्यांना एक प्रकारे दिशा मिळवून दिली. असे मुख्याध्यापक कळस्कर पुढे म्हणाले की शिक्षण क्षेत्रातील अनेक गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विविध उपक्रमात सहभाग घेऊन उत्कृष्ट पारितोषिक मिळविले. त्यांना देखील पत्रकार कुरुमकर यांनी नेहमीच प्रसिद्धी देण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला. असे सांगून मुख्याध्यापक कळस्कर यांनी पत्रकार कुरुमकर यांच्या 25 वर्षाच्या कार्याला उजाळा दिला.
याप्रसंगी सत्कारला उत्तर देताना पत्रकार नंदकुमार कुरुमकर यावेळी म्हणाले की, विद्याभूषण व शिक्षण महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या धरतीवरच शिक्षण संस्था उभारून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला गावातच शिक्षण उपलब्ध करून दिले. बापूंच्या या दूरदृष्टीमुळेच आज अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी, उद्योजक, वैमानिक झाले आहेत. याचे सर्वश्रेय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंना जाते हे कोणीही नाकारू शकत नाही, बापूंच्या नंतर नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी देखील या आदर्श शिक्षण संस्थेला बळ देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ही एक तालुक्यातील आदर्श शिक्षण संस्था मानले जाते. असे सांगून विद्यालयाने जो सन्मान केला त्याबद्दल कुरुमकर यांनी विद्यालयाचे आभार मानले.
यावेळी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन उपशिक्षक ओंकार धुमाळ यांनी केले आभार झुंबरराव काळे यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.