शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या विरोधात आमदारांनी विधीमंडळात आवाज उठवावा : बाबासाहेब भोस
By : Polticalface Team ,06-12-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी,)डिसेंबर 2023
विधान परिषदेतील शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या आमदार निधी मधून श्रीगोंदा तालुक्यातील विविध विद्यालयांना संगणक वाटपाचा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील महादजी शिंदे विद्यालयात पार पडला.
सध्याच्या काळात शिक्षण व्यवस्था संक्रमण अवस्थेमधून जात आहे अशावेळी शिक्षण व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडत आहेत शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून आमदारांनी विधान परिषदेमध्ये शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेच्या प्रश्नांवर आवाज उठवला तर शिक्षक पाठीशी उभा राहतील, असे मत यावेळी बोलताना रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना आमदार किशोर दराडे यांनी मी आमदारनिधी मधूनच नव्हे तर स्वखर्चान नाशिक विभागातील प्रत्येक शाळेपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर तसेच शिक्षकांच्या प्रश्नावर मी सातत्याने विधिमंडळात भूमिका राहील असे प्रतिपादन केले.
यावेळी शिक्षक संघटनेचे सचिव रमजान हवालदार, जुनी पेन्शन संघटनेचे सुनिल भोर यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक संघटनेचे सचिव राजेंद्र खेडकर, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन झगडे श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक रामदास झेंडे श्री सहाय्यक हरिभाऊ मुंदे जगताप सर मडवे सर समन्वयक मुख्याध्यापक दत्तात्रेय सस्ते सर, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांच्य्याासह तालुक्यातील विविध विद्यालयातील मुख्याध्यापक, सेवक वृंद व विविध शिक्षक संघटनातील कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार किशोर भाऊ दराडे यांनी श्रीगोंदा तालुक्यात प्रामुख्याने चिखली, कोळगाव, घारगाव, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, मढेवडगाव, काष्टी आणि श्रीगोंदा आधी विद्यालयाला सदिच्छा भेटी देऊन तेथील उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शंका समाधान व शालार्थ आयडी वैद्यकीय बिले, वैयक्तिक मान्यता, शिक्षकेतर कर्मचारी भरती बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ बोडखे ,सूत्रसंचालन विलास लबडे, आभार प्रदर्शन शिक्षक बँकेचे संचालक दिलीप काटे यांनी केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी