ग्रामसभेत ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कामाविषयी ग्रामस्थांमधून तीव्र नाराजीचा सूर

By : Polticalface Team ,06-12-2023

ग्रामसभेत ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कामाविषयी ग्रामस्थांमधून तीव्र नाराजीचा सूर लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव ग्रामपंचायत ची ग्रामसभा बुधवारी सहा डिसेंबर रोजी सरपंच सौ. समीक्षा ठोमसकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी ग्रामसभेपुढे चार महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने ग्रामविकास अधिकारी श्री धायगुडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. आपले गाव आपला विकास या अंतर्गत सन 2024 25 25 चा आराखडा तयार करणे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत समृद्धी आराखडा तयार करणे, सन 2024 25 ग्रामपंचायतच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. दरम्यान या ग्रामपंचायतीची 30 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेली ग्रामसभा कोरमाभावी सहकुब करण्यात आली होती. त्यामुळे आज बुधवारी 6 डिसेंबर रोजी या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ग्रामसभेत युवक कार्यकर्ते किरण कुरुमकर यांनी आपल्या भाषणात ग्रामविकास अधिकारी श्री धायगुडे हे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वेळ देत नाहीत. ग्रामस्थांनी यापूर्वी सुचविलेल्या ग्रामसभेत विकास कामांची माहिती देत नाहीत, मध्यंतरी ज्या ग्रामस्थांनी विविध विकास कामासंदर्भात उपोषणे केली, त्याची कार्यवाही ग्रामविकास अधिकारी करत नाहीत. त्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्यात यावे. गावची ग्रामपंचायत मोठी असल्याने सदर ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत मध्ये कार्यालयीन कामात वेळ देत नाही गावचे सहा प्रभाग असल्याने अनेक ग्रामस्थ कामासाठी ग्रामपंचायतीमध्ये ताटकळत बसतात. ग्रामस्थांमधून ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कारभारासंदर्भात अनेक तक्रारी येत आहे त्यामुळे ग्रामाविकास अधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव घेण्यात यावा. तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत बंद पडलेले विकास काम तातडीने सुरू करण्यात यावे. नाशिकच्या पुरातत्त्व विभागाकडून या प्रलंबित कामासाठी योग्य ते मार्गदर्शन घ्यावे, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी आमची राहील असे सांगून युवक कार्यकर्ते किरण कुरुमकर यांनी ग्रामपंचायत अंतर्गत विवििध प्रलंबित मुद्दे मांडले.
याप्रसंगी माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य अरविंद कुरुमकर, निलेश कुरुमकर, निळकंठ जंगले, जालिंदर कुरुमकर, बाबासाहेब ओहोळ, सोमनाथ कुरुमकर आदींसह अन्य ग्रामस्थांनी ग्रामपंचायत अंतर्गत विविध प्रश्न उपस्थित करत चर्चेत सहभाग घेतला.
या ग्रामसभेस उपसरपंच विशाल कुरुमकर यांच्यासह ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य, कृषी सहाय्यक संतोष झेंडे, उदयसिंह जंगले, नंदकुमार ठोमसकर, प्रवीण कुरुमकर, बापूराव बाबर, मसुदेव कुसाळकर, दीपक कुरुमकर, सर्पमित्र कमलेश गुंजाळ सतीश फलके, सतीश काशिनाथ भगत आदींसह ग्रामस्थ व ग्रामपंचायतचे कार्यालयीन कर्मचारी आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार ग्रामपंचायत सदस्य सुदाम पवार यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी