संकल्प करणारा वारकरी (ह.भ.प शरद कुरुमकर)

By : Polticalface Team ,11-12-2023

संकल्प करणारा वारकरी
 (ह.भ.प शरद कुरुमकर)
 लिंपणगाव( प्रतिनिधी) वयाच्या पासष्टीत दररोज ३५ ते ४० किलोमीटर पायी चालून लिंपणगाव (श्रीगोंदा) ते श्री क्षेत्र आळंदी हे १०० किलोमीटर अंतर अवघ्या तीन दिवसात पार करण्याचा संकल्प करणारा वारकरी.
"घालूनिया भार राहिलो निश्चिती |मिरविली संती विठोबाशी" या उक्तीप्रमाणे लिंपणगाव (मुंढेकरवाडी) येथील वारकरी ह.भ.प श्री शरदराव कुरुमकर यांनी कार्तिकी एकादशी व श्री संत ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा निमित्त आळंदी वारी तीन दिवसात १०० किलोमीटर चालण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णत्वास नेला.
सविस्तर वृत्त असे की, श्री कुरुमकर यांनी बुधवार दिनांक ६/१२/२०२३ रोजी दुपारी ११ वाजता वैष्णव पताका खांद्यावर घेऊन आळंदी कडे प्रस्थान केले. वाटेत कुठेही न बसता संथ गतीने चालून सायंकाळी सात वाजेपर्यंत लिंपणगाव ते न्हावरा ४० कि.मी. अंतर ८ तासात गाठले तर गुरुवार दिनांक ७ रोजी न्हावरा ते तळेगाव हे ३० कि.मी.अंतर ६ तास आणि शुक्रवार दिनांक ८ रोजी तळेगाव ते आळंदी हे ३५ कि.मी. अंतर ७ तास चालून तुळापूर येथील धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अलंकापुरी तीर्थक्षेत्रात प्रवेश केला.
शनिवार दि.९/१२/२०२३ रोजी सकाळी इंद्रायणीत गंगा स्नान करून नगर प्रदक्षिणा व दर्शन घेऊन दुपारी १२ वाजता आळंदी ते देहू ४ तास चालून संत तुकाराम महाराजांच्या शिला मंदिर, स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुकाराम महाराज वैकुंठ गमन मंदिर आणि गाथा मंदिर दर्शन घेऊन पद यात्रेची सांगता झाली. देहू येथे त्यांचे जावई श्री स्वप्निल भाऊसाहेब बांदल व मुलगी प्रियांका आणि श्री सुरज भाऊसाहेब बांदल व सायली बांदल यांनी स्वागत केले तर दोन वर्षाच्या चिमूरड्या नातीन हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
वाटचालीत श्री शेटे (काष्टी), सचिन जाधव (वांगदरी), सुधीर काळे (निमोणे), गजानन शिंदे, बाळू सोनबा मासाळ (शिरजगाव),अर्चना काळे (निर्वी), रोहित कदम(न्हावरा), सोमनाथ कोळपे(उरळगाव), सुभाष जाधव (शिक्रापूर), लालचंद नहार (मरकळ) यांनी चहापाणी व स्वागत केले तर श्री. कुरुमकर यांच्या व्यसनमुक्ती जनजागृती या उपक्रमाचे कौतुक केले.
वाटचालीत अक्षय जयवंत वेताळ (न्हावरा), तोडकर बंधू (तळेगाव), मढेवडगाव तालुका.श्रीगोंदा दिंडी व्यवस्थापक आळंदी यांनी जेवण व आश्रय दिला.
श्री कुरुमकर हे 1990 पासून लिंपणगाव ते पंढरपूर आषाढी पायीवारी करतात ते दरवर्षी वेगवेगळे संकल्प करतात. १५ वर्षांपूर्वी वयाच्या पन्नाशीत त्यांनी दररोज ६० ते ६५ कि.मी. अंतर चालून २०० कि.मी. अंतर ३ दिवसात पार करून श्री क्षेत्र पंढरपूर गाठले होते. हा त्यांचा एक विक्रमच म्हणावा लागेल.
"भक्त पुंडलिक जाणीव जागृती", "भारतीय सु-संस्कृती" आणि "व्यसनमुक्ती जन जागृती" या त्रिसूत्री उपक्रमाचा मुख्य उद्देश त्यांच्या पायीवारीतील आहे. "संकल्पाचा दाता नारायण" या उक्तीप्रमाणे त्यांच्या सर्व संकल्प पूर्णत्वास जातात ही भगवंत कृपाच म्हणावी लागेल. म्हणून संकल्प करणारा वारकरी अशी त्यांची ओळख आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष