जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर संघटनेच्या बैठकीत शिक्षकेतरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न संदर्भात गांभीर्याने चर्चा
By : Polticalface Team ,11-12-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळा अंतर्गत सलग्न असणाऱ्या जिल्हा माध्यमिक शाळा संघटनेची बैठक नुकतीच अहमदनगर येथे माध्यमिक शिक्षक भवनात राज्य शिक्षकेतर महासंघाचे सचिव पाराजी मोरे व जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे मार्गदर्शक समशेर भाई पठाण जिल्ह्यातील शिक्षकेतरांच्या विविध प्रलंबित प्रश्न संदर्भात बैठक उत्साही वातावरणात संपन्न झाली
प्रामुख्याने माध्यमिक शिक्षकेतर यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न 12 व 24 ची वरिष्ठ व कालबद्ध पदोन्नती, तसेच 10,20,30 आश्वासित प्रगती योजना यासंदर्भात शिक्षकेतर महामंडळाकडून शिक्षण आयुक्त यांना पत्रव्यवहार करताच तात्काळ यासंदर्भात वित्त विभागाकडून माहिती मागण्यात आलेली आहे. तसेच 1 हजार विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांना पूर्णवेळ ग्रंथपाल पदासाठी राज्यातील शिक्षक आमदार पुढाकार घेत आहेत. तोही प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे संघाचे महासचिव पाराजी मोरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. याबरोबरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवेत असताना शैक्षणिक अहर्ता पूर्ण केलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक पदी पदोन्नती देण्यात यावी, नवीन आकृतीबंधानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तात्काळ पदे भरावीत, सेवा ज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी, चतुर्थ श्रेणी ची पदे रद्द करण्याच्या शासन निर्णयास विरोध करण्याचा संकल्प देखील राज्य महासंघाने घेतला असल्याचे महासचिव पाराजी मोरे यांनी सांगितले. जुनी पेन्शन स्थितीबाबत आंदोलनाचा विचार यावेळी करण्यात आला. जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासन स्तर शिक्षण विभाग पे युनिट लेखाधिकारी कार्यालय अडचणी यावेळी समजून घेण्यात आल्या. 24 डिसेंबर पासून राज्य सरकारी निमसरकारी संपामध्ये सामील होणे आदी विषय गांभीर्याने घेण्यात आले.
दरम्यान या बैठकीत शिक्षकेतर संघटनेचे मार्गदर्शक समशेर भाई पठाण यावेळी म्हणाले की, राज्य सरकार शिक्षकेतरांच्या मागण्यांकडे अनेक वर्षापासून अन्याय करत आहे. अनेक शाळांमध्ये सेवानिवृत्त व मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकेतरांच्या संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. राज्य सरकार मात्र या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. याउलट राज्य सरकार शिक्षण क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने भरती करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आयुष्य धुळीस मिळवत आहे. काही शिक्षण संस्थांमध्ये सेवा जेष्ठता डावलून शिक्षकेतरना पदोन्नती दिल्या जातात. त्यामुळे आता सर्वांना नव्याने नोंदणीकृत राज्य शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष वाल्मीक सुराशे सर व राज्य महासचिव पाराजी मोरे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली सर्वांना वर्जिमूट बांधावी लागेल. लवकरच संपूर्ण राज्यात नव्याने नोंदणीकृत झालेल्या राज्य शिक्षकेतर महामंडळा अंतर्गत राज्यात प्रत्येक जिल्हा व तालुका संघटनेची नव्याने बांधणी करून शिक्षकेतरांच्या अनेक प्रमुख मागण्यासाठी लढा उभारावा लागेल, ,असे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे मार्गदर्शक समशेर पठाण यांनी यावेळी या बैठकीत सांगितले.
या जिल्हा शिक्षकेतर संघाच्या बैठकीस माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे हे आवर्जून उपस्थित राहून शिक्षकेतरांच्या प्रलंबित प्रश्न संदर्भात अडचण येईल तिथे आम्ही आपणाला ताकद देऊ, असे आश्वासित करत ते पुढे म्हणाले की,निश्चितच राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे व महासचिव पाराजी मोरे, समशेर पठाण हे अत्यंत अनुभवी व अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याने शिक्षकेतर बांधवांना निश्चितपणे त्यांच्या अथक प्रयत्नातून न्याय मिळेल, तसेच राज्य सरकार शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्राचे खाजगीकरण करून कंत्राटी पद्धतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी पावले उचलत आहेत. त्यामुळे आता सर्वांनाच मतभेद बाजूला ठेवून या शासन निर्णया विरुद्ध लढा उभारावा लागेल, असे संचालक श्री बोडखे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान नव्याने नोंदणीकृत झालेल्या राज्य शिक्षकेतर महामंडळ अंतर्गत जिल्ह्यातील तालुका पदाधिकाऱ्यांसह शिक्षकेतर मेळावा नगर तालुक्यातील भिंगार येथील मातोश्री उर्दू हायस्कूल येथे 21 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्याची घोषणा यावेळी संघटनेचे मार्गदर्शक समशेर पठाण यांनी यावेळी जाहीर केली.
या जिल्हा बैठकीस राज्य शिक्षकेतर महामंडळाचे उपाध्यक्ष राजू पठाण, परशुराम वेताळ, भाऊसाहेब धनवटे, पत्रकार नंदकुमार कुरुमकर, सदाशिव काटकर, कचरू जोर्वेकर, संजय तुरकने, गणेश पवार, रणजीत गायकवाड, तौसिफ शेख, किशोर बरकडे, शहादेव लोणारी, सोपान गायकवाड, नारायण ढाकणे आदी जिल्हा व तालुका शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भाऊसाहेब धनवटे यांनी केले. आभार परशुराम वेताळ यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.