श्रीगोंद्यात राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद

By : Polticalface Team ,14-12-2023

श्रीगोंद्यात राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद
लिंपणगाव( प्रतिनिधी)- राज्य सरकारी निम सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या आदेशानुसार आज गुरुवारी 14 डिसेंबर पासून सर्वच शासकीय निमशासकीय खात्यातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. प्रामुख्याने राज्य सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी 2005 नंतर सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्यात यावे, सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची तात्काळ नोकर भरती करण्यात यावी, कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा या सह विविध प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील कर्मचाऱ्यांनी आपला बेमुदत संप पुकारला आहे. श्रीगोंदा तालुक्यात श्रीगोंदा तालुका राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी संघटनेने या संपात मोठ्या संख्येने सहभागी होत श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी शासनविरोधी धरणााचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी निषेध सभेचे अध्यक्षस्थानी तालुका कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष जनार्दन सदाफुले हे होते.
या संपात सर्वच विविध खात्यातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून या बेमुदत संपाला पाठिंबा व्यक्त करत शासनविरोधी निर्णयााचा निषेध केला.
याप्रसंगी भिवसने सर यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, एक नोव्हेंबर 2005 नंतर जुन्या पेन्शनचा हक्क शासनाने काढून घेतलेला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात या शासन विरोधी निर्णयाचा धिकार करण्यात येत आहे. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी बेमुदत संपात सर्वांनी एकजुटीने सामील व्हावे असे आवाहन यावेळी केले.
यावेळी बापूराव गायकवाड आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शासनाला जुन्या पेन्शन संदर्भात अहवाल प्राप्त झालेला असताना राज्य सरकार वेळ काढून पणा करत आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या रस्ता असताना सरकार मात्र कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी खेळत आहे. कर्मचाऱ्यांकडून भारत देशाला इन्कम टॅक्स द्वारे मोठ्या प्रमाणात रक्कम मिळते, तरी देखील शासन जुन्या पेन्शन संदर्भात निर्णय घेत नाही. .त्यामुळे सर्वांनी राज्य समन्वय समिती जोपर्यंत संप मागे घेत नाही तोपर्यंत सर्वांनी संपात सहभागी व्हावे असे आवाहन गायकवाड यांनी केले.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम आर पवार यावेळी म्हणाले की, पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, आणि तो मिळालाच पाहिजे. पेन्शन बंद करून शासनाने कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी खेळ चालवला आहे. आता जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या बेमुदत संपाच्या भूमिकेवर ठाम राहावे असे सांगितले.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस एम लगड यावेळी आपल्या आक्रमक शैलीत बोलताना म्हणाले की, जुनी पेन्शन आणि नवी पेन्शन हा वाद शासनाने सुरू केला आहे. जुनी पेन्शन योजना का नको? वास्तविक पाहता कर्मचारी संघटनेने मागील संप काळात मागणी्यांसंदर्भात ठाम न राहता ही संधी गमावली गेली. आता मात्र संप मागणी विना मागे घेतला तर सर्वांचेच भविष्य अंधकारमय असणार आहे. संप पुकारण्याचा अधिकार सुद्धा राहणार नाही. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने बेमुदत संपावर ठाम राहावे असे आवाहन श्री लगड यांनी केले.
यावेळी राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचे राज्य समन्वयक सुनिील भोर यांच्यासह विविध खात्यातील संघटना प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा शिक्षक संघाचे सचिव रमजान हवलदार यांनी राज्य सरकारने समन्वय समितीच्या मागण्यांचा विचार केला नाही तर आम्हाला देखील दहावी व बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकावा लागेल असे सांगून शासन निर्णयावर हवलदार यांनी कडाडून विरोध केला.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनीही आंदोलन स्थळी भेट देऊन संपकर्यांना आपला पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड तहसीलदार हेमंत ढोकले आदींनी पाठिंबा देत कर्मचारी समन्वय समितीचे निवेदन स्वीकारून आपल्या भावना शासनापर्यंत सादर करू असे आश्वासन यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिले.
याप्रसंगी जिल्हा शिक्षक भारती संघटनेचे आप्पासाहेब जगताप, राजेंद्र खेडकर, देविदास खेडकर, राम जंजिरे, नवनाथ गोरे, अशोक आळेकर, प्रा रूपाली कुरुमकर, प्रा रूपाली बोरुडे, नागेश लोखंडे, डॉ टकले, राम जाधव, सचिन झगडे, नंदकुमार कुरुमकर, सुनील म्हस्के, ग्रामसेवक पानसरे घोरपडे, मेहेत्रे, सतीश भालेराव, जयराम धांडे, श्रीमती तोडकर आदी सह राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप काटे यांनी केले आभार तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र खेडकर यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.