प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने नूतन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचा सत्कार संपन्न
By : Polticalface Team ,14-12-2023
करमाळा (प्रतिनिधी) रावगाव येथील प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने करमाळा तहसीलच्या नूतन तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सौ. ठोकळे मॅडम बोलताना म्हणाल्या की प्रथम
प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार झाल्याबद्दल मी आभारी आहे आपण आपल्या संस्थेच्या वतीने जे सामाजिक उपक्रम राबवता त्यासाठी आमच्या प्रशासनाकडून आपल्या समाज उपयोगी कार्याला सदैव पाठिंबा राहील असे ठोकडे बोलताना म्हणाल्या यावेळी प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हनुमंत लोंढे अमोल लोंढे प्रकाश चव्हाण विष्णू जानकर दीपक लोंढे आधी सह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :