जेऊर येथील ओढा खोलीकरण कामासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे माजी आमदार पाटील यांनी केली मागणी
By : Polticalface Team ,14-12-2023
करमाळा प्रतिनिधी
जेऊर येथील ओढा खोलीकरण कामासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या कडे केली आहे. नागपूर येथे सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असून करमाळा मतदार संघातील विविध प्रश्ना विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन सादर करण्यासाठी तसेच विविध विभागातील मंत्री महोदय यांना भेटून प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील हे सध्या नागपूर येथे गेले असून त्यांनी मृद् व जलसंधरण मंत्री संजय राठोड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जेऊर शहराच्या उत्तर ते पूर्व भागात असलेल्या तीन किलोमीटर लांबीच्या ओढा खोलीकरण कामासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. पावसाळ्यात या ओढ्यास इतर गावातील पाणी मिसळून जाते व जेऊर शहरातील पूर्व भागांत ओढ्या शेजारील भाग हा पाण्याखाली जातो. वर्षानुवर्षे ही समस्या प्रलंबित असून यावर ग्रामपंचायत जेऊर यांनी आता ही मागणी केल्याने या कामाबद्दल मा आ पाटील यांनी नामदार संजय राठोड यांची भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा केली .यावर मंत्री महोदय यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वसनही दिले आहे. जेऊर शहराचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून ओढा खोलीकरण करून अतिरिक्त पाणी शहरात शिरणार नाही यावर उपाय योजना करणे तसेच ओढा काठा वरील तीन किलोमीरवर लांब असलेल्या एक फुटपाथ नागरिकांना फिरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच या भागाचे संपूर्ण सुशोभीकरण केले जाणार असून वनराई अर्थातच ओढा काठच्या भागात वृक्ष लागवड करून या भागाची शोभा वाढवण्यात येणार आहे.यामुळे या कामाचा पाठपुरव्यानंतर आता प्रत्यक्ष माजी आमदार नारायण पाटील यांनी या कामास निधि मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाचक क्रमांक :