मांगी तलाव संदर्भात खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दिल्लीत महत्वपूर्ण बैठक -१५ जानेवारीपर्यंत तलाव कुकडी प्रकल्पात विलीनकरणं बाबत अहवाल येणार : गणेश चिवटे

By : Polticalface Team ,14-12-2023

मांगी तलाव संदर्भात खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दिल्लीत महत्वपूर्ण बैठक -१५ जानेवारीपर्यंत तलाव कुकडी प्रकल्पात विलीनकरणं बाबत अहवाल येणार : गणेश चिवटे करमाळा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अविरत प्रयत्नामुळे १५ जानेवारीपर्यंत मांगी तलाव कुकडी प्रकल्पात विलीनिकरण अहवाल येणार असलेची अधिकृत माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी दिली आहे.याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की,मांगी तलावसंदर्भात खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची काल दिल्लीत याबाबत महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे.मांगी तलाव कुकडी प्रकल्पात कायमस्वरूपी विलीन करण्याची मागणी या भागातील नागरिक गेली ५० वर्ष करीत होते.परंतु या मागणीला यश येत नव्हते परंतु माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विलिनी करणासंदर्भात गत जून- २०२३ मध्ये मागणी केली होती. खासदारांनी यामध्ये लक्ष घालून संपूर्ण कुकडी प्रकल्पाचे फेरजलनियोजन करण्याचे नियोजन केले.यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून घेतला.केंद्र सरकारच्या वेबकॉस या संस्थेमार्फत अवघ्या ६ महिन्यात फेरजलनियोजन अहवाल बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची काल वेबकॉस संस्थेचे CEO शंभु आझाद यांच्यासोबत दिल्ली येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे.या संस्थेचा अहवाल १५ जानेवारीपर्यंत तयार होऊन मांगी तलाव कुकडी प्रकल्पात अधिकृतरित्या कायमस्वरूपी विलीन होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.मांगी तलाव कुकडी प्रकल्पात विलीन झाल्यानंतर या तलावावर अवलंबून असलेल्या २५-३०गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.करमाळा,जामखेड,कर्जत,परांडा या भागातील बाजार समिती व सर्व साखर कारखाने,दुग्ध व्यवसाय यासह सर्वच छोट्या- मोठ्या व्यावसायांना सोन्याचे दिवस येणार आहेत.करमाळा शहर व परिसरातील लोकांमध्ये मोठी भरभराट होणार आहे असे चिवटे यांनी शेवटी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष