आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ. दौंड तालुक्यात बहुजन सर्व ओबीसी पर्व. आक्रमक. केडगाव चौफुला हायवे रस्ता रोको आंदोलन संपन्न.
By : Polticalface Team ,14-12-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता.१३ डिसेंबर २०२३. रोजी दौंड तालुक्यातील बहुजन सर्व ओबीसी पर्व. तसेच जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने केडगाव चौफुला महामार्गावर दि १३ डिसेंबर रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी दौंड तालुक्यातील बहुजन सर्व ओबीसी पर्व जनसमुदाय मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. इंदापूर येथील घडलेल्या असंवेदनशील घटनेचे राज्यात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले आहेत. आमदार मा.गोपीचंदजी पडळकर यांच्यावर दिनांक ०९ डिसेंबर २०२३ रोजी इंदापूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव चौफुला येथे रस्ता अडवून निषेध व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी इंदापूर येथे घडलेल्या असंवेदनशील घटने विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. संबंधित हल्ला खोरांणवर पोलीस प्रशासनाने कायदेशीर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली. दौंड तालुक्यातील ओबीसी समाज जशाच्या तसे उत्तर दिल्या शिवाय राहणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी. असा इशारा उपस्थित ओबीसी नेत्यांनी दिला आहे.
या प्रसंगी उपस्थित दौंड तालुक्यातील ओबीसी नेते मा.डॉ. शशिकांत तरंगे. मा.बापुरावजी सोलंकर. मा पांडुरंग आण्णा मेरगळ. मा.महेश आण्णा भागवत. मा दौलत आण्णा ठोंबरे. मा संजय नाना इनामके.मा प्रियदर्शन कोठारे. अँड शिंदे. तसेच जय मल्हार क्रांती संघटना पच्छिम महाराष्ट्र उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव. अतुलजी टेळे. अनिकेत भागवत संभाजीराव खटके बाळासाहेब तोंडे. धनाजी बाप्पू टेंगले आण्णा तांबे. रामचंद्र भागवत प्रविण होले. आदी दौंड तालुक्यातील बहुजन सर्व ओबीसी पर्व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय मल्हार क्रांती संघटना पश्चिम महाराष्ट्र) मा.दौलत नाना शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे लक्ष्मण जाधव उपाध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना यांनी या वेळी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
वाचक क्रमांक :