करमाळा तालुक्यात तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामासाठी 4 कोटी 20 लाख निधी मंजूर

By : Polticalface Team ,20-12-2023

करमाळा तालुक्यात तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामासाठी 4 कोटी 20 लाख निधी मंजूर करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय असलेल्या महसूल विभागातील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय बांधकामासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून डिसेंबर 2023 च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 4 कोटी 20 लाख निधी मंजूर झाला आहे .यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शहरांमध्ये हेलपाटे घालण्याची आता आवश्यकता राहणार नाही.
प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत कार्यालय असते परंतु तलाठी कार्यालय तालुक्यांमध्ये जवळपास नाहीतच .जी आहेत ती मोडकळीला आलेली आहेत किंवा ग्रामपंचायतीच्या आश्रयाने उभी आहेत ही अडचण लक्षात घेऊन आमदार संजयमामा शिंदे यांनी तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामासाठी प्रत्येकी 15 लाख रुपये याप्रमाणे 28 बांधकामासाठी 4 कोटी 20 लाख निधी मंजूर केला आहे.
या गावात होणार मंडळ अधिकारी कार्यालय- करमाळा, जेऊर, केम ,सालसे, अर्जुननगर ,कोर्टी, केतुर व उमरड .
या गावात होणार तलाठी कार्यालय - देवळाली, जातेगाव, वांगी, निंभोरे, गुळसडी ,कंदर ,घोटी, पांगरे, आवाटी साडे कोळगाव करंजे रावगाव वीट जिंती हिंगणी कात्रज , चिखलठाण ,वाशिंबे व शेटफळ.
चौकट - दुर्लक्षित विषयांकडे आ. संजयमामा शिंदे यांचे बारीक लक्ष रस्ते,पाणी, वीज या समस्यांबरोबरच दुर्लक्षित असलेल्या विषयांकडे आमदार संजयमामा शिंदे यांनी बारीक लक्ष दिले असून करमाळा तालुक्यात गेल्या 4 वर्षात नवीन बांधकामासाठी जवळपास 100 कोटी पेक्षा अधिक निधी त्यांनी आणलेला आहे. यामध्ये डिकसळ पूल - 55 कोटी, नगरपरिषद नवीन इमारत , सांस्कृतिक भवन व छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणे बांधकाम -10 कोटी, उपजिल्हा रुग्णालय करमाळा श्रेणीवर्धन करून 100 खाट रूपांतर -25 कोटी, उपजिल्हा रुग्णालय करमाळा अधिकारी व कर्मचारी वसाहतीसाठी - 18 कोटी, सहाय्यक निबंधक कार्यालय बांधकामासाठी -1 कोटी 69 लाख, ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी -4 कोटी.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.