मकाई सहकार कारखान्याचे थकीत ऊस बिल 25 डिसेंबर पर्यंत न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी सभासदाचा भव्य मोर्चाकाढणार- प्रा. रामदास झ़ोळ
By : Polticalface Team ,20-12-2023
करमाळा प्रतिनिधी मकाई साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल 25 डिसेंबरपर्यंत कसल्याही परिस्थितीत देणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्फत मकाई चेअरमन कार्यकारी संचालक यांनी सांगितले आहे. जर 25 डिसेंबर पर्यंत थकीत ऊस बिल शेतकऱ्याच्या खात्यावर जमा न केल्यास सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. उमरड येथील ग्रांमपंचायत कार्यालय येथे मकाई कारखाना शेतकरी सभासदांची बैठक पार पडली .या बैठकिला आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन वामनदादा बदे अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने,दिलीप मुळे महाराज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे उमरड येथील मकाई कारखाना ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक रामदास झोळसर म्हणाले की आपण करमाळा तहसील कार्यालयावर 8 डिसेंबर रोजी थु थु आंदोलन केले.यावेळी बेमुदत आंदोलन करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी आमचा आग्रह होता पंरतु जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना मकाई कारखान्यांनी 25 डिसेंबर पर्यंत आम्ही कसलेही परिस्थितीत बिल देणार असल्याचे सांगितल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आंदोलन स्थगित केले.आम्हाला वाटले की 25 डिसेंबर च्या अगोदर शेतकरी सभासदाच्या खात्यावर बिल जमा होईल परंतु 25 डिसेंबरला फक्त एक आठवडा अवधी राहिला असून अद्यापही मकाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन संचालक कार्यकारी संचालक यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या हालचाली दिसून येत नाहीत. एकंदर परिस्थिती बघता मकाई सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासद पैसे कसे देणार हा एक प्रश्न आहे. त्यांनी जर 25 डिसेंबरच्या आधी बिल दिले तर आम्ही सर्व शेतकरी बांधवासह त्यांचा सत्कार करू बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी त्यांच्या तत्कालीन चेअरमन काळामध्ये ही बिले थकीत ठेवली आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठा प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. एकीकडे मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी सावकाराचे बँकेचे कर्ज प्रपंचाची ओढाताण दुष्काळा चा फटका सर्वसामान्य शेतकरी सभासदाला बसला असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून 25 डिसेंबर पर्यंत थकीत ऊस बिल न दिल्यास याचा मोठा उद्रेक होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही .त्यामुळे याची प्रशासनाने दखल घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 25 डिसेंबर पर्यंत कसल्याही परिस्थितीत मकाई सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी सभासदाला थकीत ऊस बिल देण्यासाठी सुचित करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढून कारखान्याचे मालमता जप्त करून शेतकऱ्यांना ऊस बिल तात्काळ मिळवुन देऊन सहकार्य करण्याची मागणी प्रा. रामदास झोळसर सर यांनी केली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.