अन्यथा मागण्यांच्या पूर्ततेसाठी 18 डिसेंबर पासून शेतकऱ्यांचे घारगाव येथील माता मंदिरात आमरण उपोषण

By : Polticalface Team ,20-12-2023

अन्यथा मागण्यांच्या पूर्ततेसाठी 18 डिसेंबर पासून शेतकऱ्यांचे घारगाव येथील माता मंदिरात आमरण उपोषण
     लिंपणगाव( प्रतिनिधी)- शेतीमालाला तात्काळ हमीभाव मिळावा, यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात तमाम शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, गेले कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला किमान हमीभाव मिळावा यासाठी धडपडत आहे. परंतु रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कोणत्याच पिक मालाला बाजार भाव मिळत नाही कधी कधी तर उत्पादन खर्च पण निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यावरती आत्महत्या करण्याची वेळ येते. असे या निवेदनात म्हटले आहे
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी आणखी पुढे म्हटले आहे की आज वाढती महागाई लक्षात घेता शेतीसाठी लागणाऱ्या पूरक गोष्टीचे बाजार भाव दिवसेंदिवस बाद होत चालले आहेत. त्यामध्ये खते, बी- बियाणे फवारणीसाठी लागणारे औषधे, डिझेल, मजुरी यांचे भाव शंभर पटीने वाढत चालले आहेत. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणी येत चालला आहे, शेतकऱ्याने पिकवलेले पीक जोपर्यंत शेतामध्ये उभे असते, तोपर्यंत बाजारात त्या पिकाला चांगला बाजारभाव असतो. पण तेच पीक बाजारा घेऊन गेल्यावरती त्याचा बाजार पडलेला असतो आणि तेच पीक विकून झाल्यावर त्याचा बाजार वाढलेल असतो
असे सांगून शेतकऱ्यांनी आणखी पुढे म्हटले आहे की, मागील वर्षी कपाशी तेरा हजार रुपये क्विंटल याप्रमाणे भाव मिळाला ,आज तीच कपाशी सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी केली जाते .तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांकडे कांदा उपलब्ध आहे, त्यावेळेस त्या कांद्याला चार ते पाच रुपयाचा भाव दिला जातो. आणि शेतकऱ्याकडील कांदा संपल्यानंतर त्याच कांद्याला चाळीस ते पन्नास रुपयांचा दर दिला जातो. अशी वेळ शेतकऱ्यावरती कायम येते. शेतकऱ्याला वेळेवर पाणी नाही, लाईट नाही, खात्रीलायक बी बियाणे उपलब्ध होत नाहीत, त्याचप्रमाणे खताचे व कीटकनाशकांचे बाजार भाव भरमसाठ वाढले आहेत. मागील काही दिवसापूर्वी गायीच्या दुधाला 35 ते 3८ रुपयाचा भाव मिळत होता पण आज त्याच दुधाला २४ ते २५ रुपये याप्रमाणे दर दिला जातो. या दराचा विचार करता शेतकऱ्याला दूध धंदा परवडत नाही, पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती जनावरांच्या चाऱ्याच्या वाढलेल्या किमती या, सगळ्या गोष्टीचा विचार करता शेतकरी अडचणीत येत चालला आहे.
आज महाराष्ट्र भर आरक्षण या विषयावरती आंदोलने चालू आहेत. नेत्यांना व कारखानदारांना या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये इंटरेस्ट आहे. पण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकवलेल्या शेतीमालाला बाजार भाव मिळत नाही. याकडे लक्ष देण्यासाठी नेत्यांना व कारखानदारांना वेळ मिळत नाही. यामध्ये सर्वसामान्य शेतकरी व कार्यकर्ता कधीकधी जातीपातीच्या नावाखाली तर कधी पार्टी पक्षाच्या नावाखाली वापर करून घेतला जातो. पण त्या शेतकऱ्याला व कार्यकर्त्याला न्याय व स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणाकडेच वेळ नाही. अशा भावना येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. प्रसंगी या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास गावच्या लक्ष्मी माता मंदिरात आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे असे या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रामुख्याने शेतीमालाला हमीभाव मिळावा, दुधाला दर वाढवून मिळावा, कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी, कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळावी, उसावरील इथेनॉल बंदी उठवावी आदी प्रमुख मागणीसाठी घारगावच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनावर संगीता खामकर, बापूराव निंभोरे, महेश पानसरे, शरद जगताप, राजेंद्र थिटे, शरद पाटोळे भूषण बडवे आदीसह 25 शेतकऱ्यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.