यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे उपशिक्षक रवींद्र भोंडवे यांना तालुकास्तरीय गणित कृतिशील पुरस्काराने सन्मानित

By : Polticalface Team ,20-12-2023

यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे उपशिक्षक रवींद्र भोंडवे यांना तालुकास्तरीय गणित कृतिशील पुरस्काराने सन्मानित लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे उपशिक्षक रवींद्र गजानन भोंडवे यांना गणित कृतीशील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान सन 2023 24 या शैक्षणिक वर्षात तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन श्रीगोंदा येथील स्वामी समर्थ प्रतिष्ठान संचालित श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय या विद्यालयात 19 डिसेंबर पासून आयोजित करण्यात आले आहे. या विज्ञान -गणित प्रदर्शन स्थळी यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे उपशिक्षक श्री रविंद्र भोंडवे यांना उद्घाटन प्रसंगी यावर्षीचा गणित कृतिशील पुरस्कार सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुकतेच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रवींद्र भोंडवे यांनी आपल्या सेवा कालावधीत गणित विषयाचे विद्यार्थ्यांना पुरेपूर ज्ञान देऊन गणित विषयात उत्कृष्ट विद्यार्थी घडवत विद्यार्थ्यांच्या उच्चांकी निकाला बाबत प्रमाणिकपणे कर्तव्य बजावले. या प्रित्यर्थ चालू वर्षी श्री भोंडवे यांना गणित कृतीशील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री भोंडवे सर यापूर्वी तालुका गणित शिक्षक संघटनेतही अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली.
तालुकास्तरीय गणित कृतीशील पुरस्कार श्री रविंद्र भोंडवे यांना मिळाल्याबद्दल सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार, शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोकराव कडूस, गटशिक्षणाधिकारी अनिलराव शिंदे श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिन राव लगड, ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी के लगड, मुख्याध्यापक सुभाषराव जामदार, राज्य जुनी पेन्शन चे समन्वयक सुनीलराव भोर, कृषक सेवा संघाचे अध्यक्ष अशोकराव कारले, विज्ञान संघटनेचे अध्यक्ष देविदास खेडकर, गणित शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बारगुजे, जिल्हा शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन दिलीपराव काटे आदींनी श्री भोंडवे यांचे अभिनंदन केले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी