दौंड पोलीस स्टेशनवर मयत श्वेता ओहळच्या नातेवाईकाकडून ठीया आंदोलन, आरोपींसह संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
By : Polticalface Team ,21-12-2023
दौंड (प्रतिनिधी) दौंड शहरातील बंगला साईट या ठिकाणी राहणाऱ्या २४ वर्षीय मयत श्वेता रोहित ओहोळ या महिलेची हत्या तिचा पती जो रेल्वे पोलीस आहे रोहित ओहोळ मयताची सासू दीर ननंद, आत्या यांनी वेळोवेळी मयत श्वेता हिच्याकडून पैसे सोने नाणे आधी घेऊन सुद्धा तिला मारहाण करण्यात येत होती याबाबत दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास याबाबत दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आली होती परंतु दौंड पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ करून संबंधित महिलेला घरी पाठवून दिले जर संबंधित महिलेची तक्रार घेऊन आरोपींवर कारवाई केली असती तर मयत श्वेताही आज आपल्यात राहिली असती, त्यानंतर तिला या सर्वांनी मिळून मारहाण करून तिला फाशी दिली जोपर्यंत संबंधिताला अटक होत नाही तसेच संबंधित पोलीस अधिकारी वर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मयत श्वेता हिचा मृतदेह दौंड पोलीस स्टेशन समोर समोरून हलवणार नाही अशी माहिती प्रमिला जाधव यांनी अशी माहिती दिली आहे, मयत श्वेताही चार महिन्याची गरोदर होती त्यामुळे आज या कुटुंबाने तीन निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी मागणी मयतच्या नातेवाईकांनी केले आहे
वाचक क्रमांक :