लिंपणगाव (प्रतिनिधी) मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथील सामाजिक कार्यकर्ते गोरखराजे मानसिंग उंडे यांनी जिल्हा परिषद उंडेमळा शाळेस डीटीएच सेवा ,विदयुतीकरण व दुरुस्तीसाठी तसेच प्रदुषण दिवाळी साजरी करून विविध किल्ल्यांची प्रतिकृती साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन प्रेरणा देण्यासाठी त्यांनी शाळेस पंधरा हजाराची देणगी दिली. ही देणगी युवानेते संग्राम शिंदे यांचे शुभहस्ते शाळेचे मुख्याध्यापक राजाराम सालके यांनी स्विकारली. यावेळी दत्तात्रय उंडे उपस्थित होते.
वाचक क्रमांक :