बहुसंख्य माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घोडेगाव जिल्हा परिषद शाळेचा ७५ वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा
                      
                
            
               By : Polticalface Team ,24-12-2023
       
               
                           
              
श्रीगोंदा, प्रतिनिधी
दिनांक २४ डिसेंबर २०२३,श्रीगोंदा:
तालुक्यातील घोडेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थ्यांमार्फत आयोजीत करण्यात आलेल्या शाळेच्या ७५ व्या अमृत महोत्सव व माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्या निमित्त उपस्थित नामांकित व्यक्ते व महाराष्ट्रभर कवी म्हणून गाजलेले गणेश शिंदे यांच्या आज रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानासाठी तालुका आणि घोडेगाव पंच क्रोशितून मोठया संख्येने श्रोते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाची रूपरेशा मांडताना माजी विद्यार्थी आणि उद्योजक संजय मचे यांनी नमूद केले की, सन १९४८ साली सुरु झालेल्या शाळेत हजारो विद्यार्थी घडले आहेत. त्यांच्या सह अनेक दिग्गज शासकीय आणि प्रशासकिय पदाधिकाऱ्यांच्या मदतीने नमूद शाळेचा चेहरा मोहरा बदलला आहे. त्यातील अनेक मान्यवरांना याठिकाणी निमंत्रित केले असुन, यावेळी उपस्थित मान्यवरांचे त्यांनी स्वागत केले.
दिप प्रवलन करण्यासाठी मनोहर विर (माजी जिल्हा शिक्षण अधिकारी).. गणेश शिंदे (कवी व व्याख्याते), अनिल शिंदे (गट शिक्षण अधिकारी), राजेंद्र आबा म्हस्के, (सरपंच) रामदास घोडके, (माजी उप सरपंच) सुदाम वाघमारे, उद्योजक संजय मचे, संतोष फटे,अजीज शेख,पत्रकार किशोर मचे, समीर मचे, समीर शिंदे, पत्रकार बाळासाहेब काकडे, गजानन ढवळे सर, डॉ.राम मचे, सतिश उलाखे, नवनाथ पवार,रमेश शेळके, विशाल मचे, संदीप पवार, नितीन वाघमारे, बाळासाहेब भिसे सर, संजय रामफळे सर, मुख्यद्यापक मिठू लंके सर विचार मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योजक सतिश मचे यांनी केले. त्यांनी सांगितले की, माजी विद्यार्थ्यांनी लोकसहभागातुन पाच वर्षात लक्षावधी रुपये निधी संकलित केला आहे. विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी दिलेल्या योगदानबद्दल आभार व्यक्त केले. वेग वेगळ्या उपक्रमांतून माजी विद्यार्थी डॉ राम मचे यांनी मोठी मदत केली. ल्यावेंडर लॅब नेही मदत केल्याचे सांगत अथर्व ग्रुपचेही स्वागत केले. यावेळी LED आणि प्रिंटर देणाऱ्या तसेच, वेगवेगळे उपक्रम राबविनाऱ्या सर्वांचे त्यांनी स्वागत केले. जिप शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्हीं सर्वजण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर व व्याखते यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी शाळेच्या आठवणींना उजाळा देणारी चित्रफित दाखवल्याने सर्व उपस्थितांची आणि माजी विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. तर, लहान थोरांनी आनंद व्यक्त केला.
प्रमूख व्याख्याते गणेश शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शाळेसाठी ज्या ज्या दानशुरांनी मदत केली त्यांचे अभिनंदन केले.. शाळेला मदत देण्याची दानत हि शिक्षणाने आणि शाळेनीच दिली. जादूची कांडी फिरून कोणताही चमत्कार होत नाही.. प्रतिकूल परिस्थितीतही पुढे जाण्यासाठी शिक्षण येवढाच पर्याय आहे. केवळ परीक्षा आणि मार्क्ससाठी आपण शिक्षणाकडे पाहण्या ऐवजी त्यापलीकडे शिक्षणाकडे पाहणे गरजेचे आहे. आपण स्वतः ला सिद्ध करण्यासाठी स्वतःवरच विश्वास ठेवायला हवा. मोठी स्वप्न बघायला हवीत, उद्योगात आणि व्यापारात यावे यासाठी शिक्षण व्यवस्थानीं लेकरांना दृष्टी दिली पाहिजे. नाहीतर आपणं फक्तं नोकऱ्यांच्या रांगा निर्माण करतोय काय...? असे भासायला नको.. यासाठी व्यवसायाकडे मार्ग निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्वाभिमान शून्य पिढी निर्माण होण्यापेक्षा मनगटावर विश्वास असणारे नागरीक शाळेने घडवले पाहिजेत... असेही शिंदे यांनी नमूद केले.. शिक्षणातून स्वाभिमानी पिढी तयार होणे अपेक्षित आहे. असे ते म्हणाले.
पुढे शिंदे यांनी स्पष्ट केले की, आत्मविश्वासाने वेगळेपण सिद्ध करण्याची ताकद उरात बाळगा. व्यवसाय आणि उद्योगात असणाऱ्या माजी विद्यार्थ्यानी आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.. जगातल्या लोकांनी आपल्या परिसरात आले पाहिजे.. अशी चौकट सोडून तरुणांनी उपक्रम राबविला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त विद्यार्थी घडवण्याचा शिक्षकांनी प्रयत्न करावा.. असे सांगत असताना अनेक उदाहणांवरून आणि संदर्भातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ज्ञानाला पर्याय नाही.. सुविधांचा अभाव सांगू नका.. अनेक लोकांनी प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल केली.. डॉ आंबेडकर, अब्दुल कलाम माणिक शहा यांच्यासह अनेक उदाहरण त्यांनी याठिकाणी दिली.. 
ग्रंथालयातील पुस्तकं वाचा.. मैदानावर शाररिक खेळ खेळा.. शरीर आणि डोकं सश्यक्त राहण्यासाठी याशिवाय पर्याय नाही. जीवनात आपणं मालक नाहीत विस्वस्त आहोत.. येथे काहीही शास्वत नाही. याबाबत कबिराच्या दोह्या चा संदर्भ सांगुन. तुकारामाचा अभंग नमूद केला.. या शाळेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी दातृत्व दाखवल.. त्यांचे आभार त्यांनी मानले.. आणि निसर्गासारखं वागा एक धान पेराल तर, त्याच्या हजारो पट परत मिळेल.. संस्कार पेरा, निसर्गाचे नियम पाळा.. आनंदी रहा.. हातात देण्याची दानत ठेवा.. काळ आणि वेळे नुसार बदला.. असे मार्गदर्शन गणेश शिंदे यांनी उपस्थितांना केले. आणि नमूद व्याख्यानाच्या शेवटी "काय सांगू राणी मला गावं सुटेना" हि त्यांची प्रसिद्ध कविता सर्वांच्या आग्रहास्तव सादर करून कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान घोडेगाव पंचक्रोशीतील व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थी व जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर निरनिराळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली..
यावेळी आमदार बबनराव पाचपुते, गौरी शुगरचे MD रोहिदास यादव, राजेंद्र आबा म्हस्के, सरपंच रामदास घोडके, डॉ. विकास सोमवंशी, डॉ.रविराज मचे, बाळासाहेब महाडिक, सोमवंशी गुरुजी, दिनकर मचे गुरुजी, राजू इथापे, जालिंदर पाडळे, मारुती वागस्कर सर, प्रमिला गावडे मॅडम, सुदाम वाघमारे, योगेश भोसले स्विय सहाय्यक, माजी मुख्याध्यापक ससाणे सर, राजेंद्र मचे, अनिल दरेकर, उत्तम फटे, डॉ.वैभव मचे, मिना मचे, मनीषा घोडके, पल्लवी शेलार, परहर मॅडम, मेजर बुलाखे, योजना तिखोने, दळवी मॅडम,  सुभाष बोराडे, दरेकर सर, गोपाळ ससाणे गुरुजी, शिंदे सर, रावसाहेब वाघमारे, दरेकर सर सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक, आजी, माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. घोडेगावचे सरपंच रामदास घोडके व माजी उप सरपंच सुदाम वाघमारे यांनी उस्थितांचे आभार व्यक्त केले.
घोडेगाव जिल्हा परिषद शाळेच्या कार्यक्रमास जिल्हा शिक्षण पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहण्यास मिळाले आधीच जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद पडत आहेत आणि शासनाचेही या बाबतीत उदासीन धोरण आहे त्यातच अधिकारीही उदासीन दिसतात हेच आजच्या कार्यक्रमात त्यांच्या अनुपस्थितीतून दिसून आले - माजी विद्यार्थी संजय मचे
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष