पुणे सोलापूर महामार्गावर यवत येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉयली झाली पलटी. दुर्दैवी घटना थोडक्यात टळली. अनेकांचा वाचला जीव. महामार्गावर वाहतूक कोंडी.
By : Polticalface Team ,25-12-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता. २४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११:३० वा जे सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर यवत येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची डबल ट्रॉयली ऊस भरुन भिमा पाटस साखर कारखाना बाजुकडे जात असताना यवत येथे महामार्गाच्या मध्ये ठिकाणी अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. या वेळी पाठीमागुन भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनावरील चालक सावध भुमिकेत असल्याने मोठा अपघात होण्यापासून थोडक्यात बचावला आहे. हि घटना रविवार दि २४ रोजी रात्री ११ :३० वा जे सुमारास घडली असून यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.
पुणे बाजुंकडून सोलापूर बाजुकडे जात असताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रॉली मध्ये प्रमाणा पेक्षा जास्त ऊस भरला असल्याने यवत पोलीस स्टेशन समोरील महामार्गावरील चढाला चढताना चालकाचा ट्रॅक्टर वरील ताबा सुटला व ट्रॅक्टर सह ट्रॉली परत मागे रिवस धाऊ लागली व प्रमाणापेक्षा जास्त भरलेल्या ऊसाची ट्रॉली महामार्गाच्या मध्ये ठिकाणी पलटी झाली. या प्रसंगी मोठा अपघात होण्या पासून थोडक्यात बचावला असल्याचे सुत्रांनी सांगितले.
या वेळी पुणे बाजुंकडून सोलापूर बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांची महा मार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस कर्मचाऱ्यांनी भुलेश्वर फाट्या पासून सेवा मार्गाने पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक सुरू केली असल्याने वाहतूक सुरळीत झाली.
पुणे सोलापूर महामार्गावर प्रमाणापेक्षा जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या व ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रॉली उरळुन पलटी झालेल्या ठिकाणी रात्री ३ :३० वा जे उशिरापर्यंत ऊस भरण्याचे काम सुरू होते. तोपर्यंत पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक सेवा मार्गाने सुरुळीत करण्यात आली होती.
पुणे सोलापूर महामार्गावरील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीमध्ये किती ऊस भरावा याचे प्रमाण आहे की नाही. ? याकडे आर टी ओ विभागाचे प्रमुख अधिकारी या संदर्भात लक्ष देतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रमाणापेक्षा जास्त ऊस वाहतूक दिसून आल्यास संबंधित ट्रॅक्टर मालक व चालक यांच्यावर कारवाई का ? केली जात नाही. असा प्रश्न नागरिकांन कडुन उपस्थित केला जात आहे. आर टी ओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात दुर्लक्ष केले असल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनी फायदा घेतला आहे. ऊसाच्या वजनावर वाहतूकदारांना कमीशन मिळते. अशी प्रतिक्रिया घटना स्थळी उपस्थित नागरिकांनी वेक्त केली. ऊस वाहतूक करणाऱ्या चालक मालकांच्या फांद्यासाठी सर्व सामान्य व्यक्तीचा बळी जाऊ नये. आर टी ओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करु नये प्रमाणापेक्षा जास्त ऊस वाहतूक धारण वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली आहे.