कुस्तीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल माजी आमदार नारायण आबा पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

By : Polticalface Team ,29-12-2023

कुस्तीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल माजी आमदार नारायण आबा पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान
 करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 कुस्तीमध्ये दिलेल्या योगदनाबद्दल माजी आमदार नारायण पाटील यांना निमगाव (केतकी) ता. इंदापूर येथील ग्रामस्थांकडून जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. जीवन गौरव पुरस्कार सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट विश्वस्तांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मल्ल सम्राट रावसाहेब मगर,  महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, , रवींद्र माळवदकर,पैलवान उत्तम दादा फरतडे, प्रशांत भागवत, शरद झोळ सर, प्रवीण ठवरे,सुभाष झोळ, ,मच्छिंद्र आप्पा चांदणे, भगवान काका घाडगे, दशरथ आप्पा बनकर,सूर्यकांत महामुनी, वसंत बापू घाडगे,भारत दादा मोरे यांचेसह सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट तसेच सुवर्ण योगेश्वर पतसंस्था आणि निमगाव केतकी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. निमगाव (केतकी) येथील कुस्तीच्या आखाड्यात हा भव्य सोहळा पार पडला. माजी आमदार नारायण पाटील यांनी सन १९८५ ते सन १९८८ या सलग चार वर्षात ७४ किलो वजन गटात महाराष्ट्रात प्रथम येण्याचा विक्रम केला होता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या या चार अधिवेशनात त्यांनी सलग चार सुवर्ण पदके जिंकली होती. तसेच ७४ किलो वजन गटात ग्रीको रोमन या कुस्ती मधील प्रकारामध्ये त्यांनी राष्ट्रीय सुवर्ण पदक मिळविले होते व देशात प्रथम येण्याची कामगिरी करून दाखवली होती. निमगाव (केतकी) येथील कुस्ती आखाड्यात त्यांनी एक काळ आपल्या कुस्तीमुळे हजारो कुस्ती रसिकांना सर्वोच्च खेळाचे प्रदर्शन करून मंत्रमुग्ध केले होते. या परिसरातील कुस्ती रसिकांचे नारायण पाटील हे आवडते पैलवान आहेत. यामुळेच निमगाव (केतकी) ग्रामस्थांनी माजी आमदार नारायण पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.माजी आमदार नारायण पाटील यांनी कुस्ती रसिकांचे आभार व्यक्त केले. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी कुस्तीसाठी आपण सतत योगदान देत राहणार असून पूर्वी एक पैलवान म्हणून प्रत्यक्ष मैदानात खेळ करत योगदान दिले तर आता लोकप्रतिनिधी म्हणून कुस्ती क्षेत्रातील समस्या सोडवून या क्रीडा प्रकाराला आणि कुस्तीगीर यांना राजमान्यता, सन्मान व गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे बोलून दाखवले. यावेळी त्यांचे समवेत महाराष्ट्र केसरी बालारफी शेख तसेच पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर तसेच पैलवान नारायण पाटील कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी