आवाटी येथील माजी सरपंच संजय नलावडे उत्कृष्ट उद्योजक म्हणून सन्मानित पुणे येथे झाला उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सत्कार संपन्न
By : Polticalface Team ,29-12-2023
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा तालुक्यातील आवाटी येथील माजी सरपंच तसेच पुणे येथील शिवांजली बिल्डरचे उद्योजक संजय दामोदर नलावडे यांचा पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने सन 2023 चा उत्कृष्ट उद्योजक म्हणून नुकताच पिंपरी चिंचवडमध्ये ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला सदरचा सन्मान हा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांच्या हस्ते तसेच राज्य महिला आयोग अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे उपस्थित होते
संजय नलावडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पुणे येथे उद्योग क्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक मिळवले आहे उद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळवल्यामुळे त्यांचा हा सन्मान करण्यात आला त्यांच्या या यशाबद्दल आवाटी ग्रामस्थांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे
वाचक क्रमांक :