लिंपणगाव सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी नागवडे गटाचे राजेंद्र कुरुमकर यांची बिनविरोध निवड
By : Polticalface Team ,29-12-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी तरुण कार्यकर्ते राजेंद्र मधुकर कुरुमकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान विद्यमान अध्यक्ष रवींद्र खळतकर यांनी ठरल्याप्रमाणे एक वर्षाच्या कालावधीनंतर राजीनामा दिला होता. या रिक्त जागेवर श्रीगोंदा येथील सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात बुधवारी 27 डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी एन बी मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्ैव संचालक उपस्थित होते या बैठकीमध्ये संस्थेच्या नूतन अध्यक्ष निवडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक राजेंद्र कुरुमकर यांचा एकमेव अध्यक्ष पदासाठी अर्ज आल्याने राजेंद्र कुरुमकर यांची संस्थेच्या नूतन अध्यक्ष पदाची घोषणा यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एन बी मुंडे यांनी केली. नूतन अध्यक्ष राजेंद्र कुरुमकर यांच्या नावाची सूचना संस्थेचे संचालक ईश्वर रेवगे सर हे होते. तर अनुमोदक संस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक लक्ष्मण भोईटे यांनी दिले. निवडीनंतर नागवडे समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
दरम्यान लिंपणगाव सेवा संस्था ही स्थापनेपासून नागवडे गटाच्या ताब्यात आहे. या संस्थेला अडचणी प्रसंगी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांच्यानंतर नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे हे नेहमीच मार्गदर्शन करत संस्थेला बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही संस्था नवलौकिकास पात्र ठरली आहे.
यावेळी निवडणूक अधिकारी एन बी मुंडे यांनी संस्थेचे नूतन अध्यक्ष राजेंद्र कुरुमकर यांचा सन्मान करत सभासद व संस्थेचे हित जोपासण्यासाठी नूतन अध्यक्ष राजेंद्र कुरुमकर व संचालक मंडळाला शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी संस्थेचे सचिव दत्तात्रय खळतकर यावेळी बोलताना म्हणाले की, लिंपणगाव संस्थेच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये तत्कालीन अध्यक्ष रवींद्र खळतकर यांनी सभासद व संस्थेचे उत्तम प्रकारे हित जोपासले, थकीत कर्ज वसुली संदर्भात वेळोवेळी आढावा घेत सभासदांना प्रवृत्त करत समाधानकारक कर्ज वसुली करून मागील आर्थिक वर्षात झालेल्या नफ्यातून बारा टक्के ने सभासदांना डीव्हीडंड देखील वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांचे मागील आर्थिक वर्षात बहुमोल सहकार्य लाभल्याचे सचिव दत्तात्रय खळदकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना संस्थेचे नूतन चेअरमन राजेंद्र कुरुमकर यावेळी म्हणाले की, सभासद व संस्थेचे हित जोपासण्यासाठी सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन संस्थेचा कारभार अधिक पारदर्शी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू संचालक मंडळाने जो माझ्यावरती विश्वास व्यक्त केला, त्याला तडा जाऊ दिला जाणार नाही, असे सांगून सर्व उपस्थित संचालक मंडळाचे नूतन अध्यक्ष राजेंद्र कुरुमकर यांनी आभार मानले.
या आयोजित बैठकीसाठी तात्कालीन चेअरमन रवींद्र खळतकर, व्हाईस चेअरमन मधुकर होले, संचालक सर्वश्री दादासाहेब कुरुमकर, लक्ष्मण भोईटे, ईश्वर रेवगे सर, अशोक होले, संपत होले, रामभाऊ टुले सखाराम निंबाळकर, संभाजी लष्करे, सौ. शकुंतला हांडे ,सौ. कमलबाई भगत आणि मोहन कोपनर आदी संचालकांसह पत्रकार नंदकुमार कुरुमकर गजेंद्र कुरुमकर डॉ लक्ष्मण चव्हाण विजय कुरुमकर बाळासाहेब जगताप नितीन कुरुमकर आदिसह यावेळी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून एन बी मुंडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून दत्तात्रय खळतकर यांनी कामकाज पाहिले.
संस्थेचे नूतन अध्यक्ष राजेंद्र कुरुमकर यांचे सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे कारखान्याचे संचालक विठ्ठलराव जंगले आदींनी अभिनंदन केले आहे. सूत्रसंचालन संस्थेचे संचालक दादासाहेब कुरुमकर यांनी केले आभार संचालक लक्ष्मणराव भोईटे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी