आदर्श माता ही आदर्श समाज घडवते ह भ प विद्याताई जगताप
By : Polticalface Team ,29-12-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- आदर्श माता ही आदर्श समाज घडवते असे प्रतिपादन आनंदगड वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.मातोश्री विद्याताई जगताप महाराज यांनी कीर्तन रुपी सेवा करताना केले. मढेवडगाव येथील आदर्श माता श्रीमती शांताबाई तुकाराम पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या परिवाराने आयोजित केलेल्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यात त्या बोलत होत्या. स्वतः अशिक्षित असूनही या मातेने तीनही मुलांना उच्चविद्याविभूषित केले. एक इंजिनीअर, एक प्राध्यापक, एक डॉक्टर झाला.पतीच्या निधनानंतर खंबीरपणे प्रपंच उभा केला. गावामध्ये सर्वांना मदत करण्याच्या या मातेचा वसा आज हा परिवार सांभाळत आहे.या कार्यक्रमाच्या निमित्ताने 85 ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप, मंदिर जीर्णोद्धार मदत,अन्नदान, करण्यात आले.
मातेच्या दूरदृष्टी मुळे समाजात आदर्श पिढी तयार होते असे प्रतिपादन जिल्हा महिला काँग्रेस च्या अध्यक्षा मा सौ अनुराधाताई नागवडे यांनी केले
आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे परिक्रमा संकुलाच्या अध्यक्ष मा सौ प्रतिभाताई पाचपुते म्हणाल्या. या अभूतपूर्व सोहळ्याचे आयोजन करून पवार परिवाराने आणखी एक आदर्श घालून दिल्याचे प्रतिपादन मा घनश्याम आण्णा शेलार यांनी केले.
घरातील वडीलधाऱ्या मंडळी या आपला अमूल्य ठेवा आहे त्याची सेवा केली पाहिजे असे मा दीपक पाटील भोसले यांनी सांगितले.
या प्रसंगी नगराध्यक्षा मा शुभंगीताई पोटे, मा सुवर्णताई पाचपुते,मा जिजाबापू शिंदे, सौ नंदिनी वाबळे, मा सरपंच सौ महानंदा मांडे, सौ देवयानी शिंदे, मा सुभाष शिंदे, मा रावसाहेब पाटील शेळके,दिलीप शिंदे गुरव, हनुमंत जाधव, प्राचार्य डॉ सूर्यवंशी सर, बबनराव सालके,जवळा च्या सरपंच सोनाली सालके,माळशिरस चे विजय शिंदे सर यांनी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा प्रताप पाटील शेळके, मा सुभाष कळसकर,मकरंद देशपांडे, सुनील जाधव,आठरे, बाळासाहेब काळे,लांडे सर, पंढरीनाथ यादव, संतोष गुंड, दिलीप पवार,बाळासाहेब दूतारे, सुनील मांडे, रामदास झंझाड भाऊसाहेब बांदल आदी मान्यवर सर्व नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अतिशय दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ प्रियंका बांदल व प्रा डॉ रघुराज कुरुमकर यांनी तर पवार परिवाराच्या वतीने आभार डॉ कु वेदश्री पवार यांनी मानले. या प्रसंगी सौ प्रतिभा इथापे यांनी या मातेचे हुबेहूब रांगोळी चित्र बनवले होते
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी