ग्रामीण कलाकारांना कलेची निश्चित प्रेरणा मिळते बाबासाहेब सौदागर

By : Polticalface Team ,01-01-2024

ग्रामीण कलाकारांना कलेची निश्चित प्रेरणा मिळते बाबासाहेब सौदागर लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे हर्षराज फिल्म प्रोडक्शन निर्मित करामती भाऊ या वेब सिरीज च्या पन्नासाव्या भागाचे प्रकाशन प्रसिद्ध चित्रपट गीतकार पटकथा संवाद लेखक अभिनेते बाबासाहेब सौदागर गायिका अभिनेत्री कविता सौदागर अभिनेत्री स्नेहल भुजबळ यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अरुण तात्या पाचपुते यांनी भुषविले.
कविता सौदागर यांनी या ग्रामीण भागातील कलावंतांनी अतीशय दर्जेदार खास नगरी बोली भाषेत अभिनय सादर करुन आपल्या जिल्ह्याची सांस्कृतिक श्रीमंती वाढविली असे गौरवोद्गार काढले . लोकप्रिय चित्रपट गीते सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.या प्रसंगी बाबासाहेब सौदागर यांनी चित्रपट क्षेत्रातील अनुभव सांगत अनेक चित्रपट गीते सादर केली.ग्रामीण भागातील कलावंतांनी जिद्दीने कलेची सिध्दी मिळवीली की प्रसिद्धी पाठोपाठ चालते येते.कलेची नशा जिवनात शान निर्माण करते हे सांगत सर्व टीम च्या अभिनयाचा गौरव केला.यावेळी या वेबसिरीज च्या शिर्षक गीतांचे आणि पोस्टर चे प्रकाशन करण्यात आले.काष्टी च्या सर्व चित्रपट प्रेमींनी एकत्रित शेअर्स जमा करुन सहकारी चित्रपट निर्मिती संस्था उभी करावी या करीता मी देवेंद्र मोरे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माते महामंडळ यांच्या सहकार्याने या संस्थेच्या संचालक या नात्याने सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अहमदनगर जिल्ह्यातील कलाकारांची परंपरा काष्टीचे हे कलाकार समृद्ध करतील असा विश्वास व्यक्त केला.चांगली साहित्य मुल्ये असलेल्या कथा निवडुन दर्जेदार गीत संगीत घेऊन चित्रपट निर्मिती झाली तर आपल्या जिल्ह्यातील कलाकारांना योग्य संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.या प्रसंगी कलाकारांना सन्मानित करण्यात आले.समाजात यशाचा एक हार गळ्यात पडतांना अपयशाचे हजारो प्रहार पाठीवर झेलावे लागतात.हार घालणारे कमी भेटतात प्रहार करणारे अनेक भेटतात.पुरस्कार देणारे कमी भेटतात तिरस्कार करणारे जास्त भेटतात.तरीही थकुन न जाता कलाकारांनी जिद्दीने कलेची सिध्दी प्राप्त करावी हे सांगताना चित्रपट क्षेत्रात गीतलेखनाच्या आठवणी सांगत दर्जेदार लावण्या देशभक्ती पर गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमात साईसेवा पतसंस्थेकडून करामती भाऊ वेब सिरीज कलाकाराचा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास साईसेवा पतसंस्थेचे चेअरमन माउली पाचपुते,नागवडे कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते, राजेंद्र फाळके, खोसे मॅडम, डाॅ जाधव, मा.ग्रा.प.सदस्य सुनिल दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते . हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी करामती भाऊ वेब सिरीजचे लेखक दिग्दर्शक संदिप जाधव, कलाकार सुरेश भंडारी, आनिल पवार, जयराम धांडे, सर्जेराव पाचपुते, रंगनाथ गदादे, डाॅ कोल्हटकर, नंदा पाचपुते, शांताराम कोकाटे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डाॅ कोकाटे यांनी केले. तर सर्जेराव पाचपुतेनी आभार मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष