श्रीगोंदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटन बांधणी संदर्भा बैठक संपन्न...
By : Polticalface Team ,02-01-2024
श्रीगोंदा :
सध्या राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटन बांधणी जोरदार चालू असून त्यात अ.नगर जिल्ह्यासह श्रीगोंदा तालुका ही मागे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेबांच्या आदेशनुसार व श्रीगोंदा तालुक्यातील किल्ले पेडगावचे सुपुत्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश नेते तथा राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा. दिपकराजे गणपतराव शिर्के साहेब यांच्या उपस्थितीत मुंबई येथे नुकतीच पक्षाच्या अ.नगर जिल्हाध्यक्ष पदी मा.प्रशांत गायकवाड यांची तर श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पदी शरद नवले यांची निवड झाली असल्याने अजितदादांच्या सूचनेनुसार श्रीगोंदा तालुक्यात संघटन भक्कम बांधणी होण्याकामी प्रदेश नेते दिपकराजे शिर्के व जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुका अध्यक्ष शरद नवले तसेच तालुका युवा नेते, माजी सरपंच पै. देवीदास (काका) शिर्के यांनी ३१ डिसेम्बर रोजी श्रीगोंदा शहरातील A स्टार हॉटेलच्या सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी दिपकराजे शिर्के होते. याप्रसंगी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुका जवळ आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांचे धूमधडाक्यात प्रवेश सुरू झाले असून, मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत अजितदादांच्या सूचनेनुसार देशात, राज्यात, जिल्हा, तालुक्यात पार्टी सक्रिय होण्यास सुरुवात झालीय. बैठकी दरम्यान झालेल्या चर्चेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. मा.अजितदादा पवार साहेबांच्या विचारांचा जिल्ह्याला लोकसभा सदस्य व तालुक्याला विधानसभा सदस्य देण्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, गावा गावात ग्रामपंचायतवर सत्तेसाठी जोरदार प्रयत्न होणार आहेत. त्याकरिता पक्ष संघटनेत कार्य करण्यासाठी इच्छुकांनी सम्पर्क साधण्याचे असे आवाहन शरद नवले व पै.देविदास काका शिर्के यांनी केले आहे.
घड्याळ तेच वेळ नवी..नवा नेता, नवा पदाधिकारी, नवा कार्यकर्ता,
जय हिंद जय राष्ट्रवादी..!!! असा जयघोष दिपकराजे शिर्के यांनी केला
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी