लिंपणगावचे शेतकरी कुकडीच्या आवर्तनापासून वंचित पाण्यासाठी शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव

By : Polticalface Team ,02-01-2024

लिंपणगावचे शेतकरी कुकडीच्या आवर्तनापासून वंचित पाण्यासाठी शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव     
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी चारी क्रमांक 132 मायनर मधून लिंपणगाव श्रीगोंदाकडे पाणी सोडण्यात आले. परंतु संबंधित कुकडीचे अधिकारी व पाणी वापर संस्थेच्या थकीत पाणीपट्टीच्या वादात लिंपणगावच्या शेतकऱ्यांना मात्र अक्षरशा रब्बी हंगामाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे लिंपणगावचे शेतकरी चांगलेच आक्रमक बनले असून, विसापूर सिंचन चे उपविभागीय अधिकारी श्री वाळके यांना पाणी प्रश्न शेतकऱ्यांनी घेराव घातला आहे. याबाबत लिंपणगावचे माजी सरपंच अरविंद कुरुमकर व निलेश कुरुमकर यावेळी बोलताना म्हणाले की, सन 2019- 20 रोजी लिंपणगावचे क्षेत्र 48 हेक्टर असताना संबंधित कुकडीचे अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक सदर क्षेत्र 285 हेक्टर म्हणजे 700 एकर क्षेत्र ओलिताखाली दाखवल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यामध्ये लिंपणगावच्या सिद्धेश्वर पाणी वापर संस्थेवर संबंधित अधिकाऱ्यांनी पाच लाख रुपये थकबाकी दाखवली गेल्याने लिंपणगावच्या शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत संबंधित कुकडीचे अधिकाऱ्यांनी सिद्धेश्वर पाणी वापर संस्थेने रब्बी हंगामासाठी पाण्याची रीतसर कागदपत्रे मागणी करूनही संबंधित उपविभागीय अधिकारी श्री वाळके यांनी लिंपणगावच्या शेतकऱ्यांना पाणी न देण्याचा निर्णय घेतल्याने लिंपणगावचे शेतकरी आणखीच आक्रमक बनले गेले आहेत. याबाबत सिद्धेश्वर पाणी वापर संस्थेचे चेअरमन सदाशिव होले यांना विचारणा केली असता ते म्हणाले की माझे घरगुती कार्यक्रम असल्याने मला पाण्याच्या मागणीकडे वेळ मिळाला नाही, परंतु तरीदेखील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता आम्ही कुकडी कार्यालयात जाऊन रीतसर पाणी मागणी अर्ज सादर केला आहे. असे असताना अधिकारी मात्र उडवडीचे उत्तरे देऊन आणि वापर संस्था व शेतकऱ्यांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हे योग्य नसल्याचे श्री होले यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चालू वर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने कमी पावसावर रब्बी हंगामाची पिके हाता तोंडाशी येत असतानाच जलसिंचन विभागाने कुकडीचे आवर्तन सोडले. परंतु जलसंपदा विभागाने पाण्याचे खाजगीकरण करून टेंडर नुसार शेतकऱ्यांना आवर्तनाचे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पाणी वाटपाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडे पाणी वापर संस्थेने मागणी करून देखील पाणी उपलब्ध करून देत नसल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे हक्काचे पाणी पासून वंचित राहावे लागत आहे. ही मोठी शोकांतिका आहे. याबाबत अधिकारी देखील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील हक्काचे पाण्याची मागणी करत असताना शेतकऱ्यांना मात्र संबंधित अधिकारी पाणी वापर संस्थेकडे बोट दाखवतात. या दोघांच्या वादात शेतकरी मात्र पाण्यापासून वंचित राहत असून या प्रकरणाला जबाबदार कोण? असा सवाल देखील शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. वास्तविक पाहता कुकडीचे आवर्तन सोडल्यानंतर शेवटच्या शेतकऱ्याला पाणी उपलब्ध होते की नाही? हे पाहणे अधिकाऱ्यांचे कर्तव्य असताना याकडे मात्र संबंधित अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नाही. सद्यस्थितीला शेवटच्या शेतकऱ्याला कुकडीचे पाणी न मिळाल्यास हातात तोंडाशी आलेली रब्बीची पिके पाण्याअभावी भुई सपाट होतील त्यातून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. असे देखील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून बोलले जात आहेत.
दरम्यान श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी या वादग्रस्त ठरलेल्या पाणी प्रश्नाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. रब्बी हंगामाचे पहिलेच आवर्तन असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे. अधिकारी मात्र वेळोवेळी लिंपणगावच्या शेतकऱ्यांना वेठीस धरून पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. यासाठी आमदांर पाचपुते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे. अन्यथा लिंपणगाव ची शेतकरी तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
पाणी उशाला मात्र कोरड घशाला अशी अवस्था लिंपणगावच्या शेतकऱ्यांची प्रत्येक वर्षी निर्माण होत आहे. त्यामध्ये चालू वर्षी देखील तेच घडले रब्बी हंगामाच्या पिकाला मात्र पाण्याची नितांत गरज असतानाही अधिकाऱ्यांकडून मात्र शेतकऱ्यांची मुस्कटदाबी केली जाते. यासाठी आता शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असून, संबंधित कुकडी अधिकाऱ्यांच्या गलत्थान कारभाराच्या विरोधात आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. लिंपणगाव चे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही वेळोवेळी प्रत्येीक रब्बी व खरीप हंगामाची पाणी वापर संस्थेकडे पाणीपट्टी रोख स्वरूपात देत आहोत. परंतु या चारी वरील 48 हेक्टर क्षेत्र असताना 285 हेक्टर ओलिताखाली क्षेत्र दाखवल्याने शेतकरी मात्र चांगलेच आक्रमक बनले आहेत. पाणी न मिळाल्यास कुकडी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा लिंपणगाव चे माजी सरपंच अरविंद कुरुमकर, युवा नेते निलेश कुरुमकर, पाणी वापर संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब कुरुमकर, अशोक होले, भरत वाल्हेकर, दीपक वाल्हेकर, लक्ष्मण वाल्हेकर, सुखदेव वाल्हेकर, आदींसह अन्य शेतकऱ्यांनी दिला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.