अखेर काष्टी लिंपणगाव रेल्वे गेटवर रेल्वे प्रशासनाकडून अपघात ग्रस्त रस्त्याची तातडीने दुरुस्ती
By : Polticalface Team ,03-01-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी )-श्रीगोंदा तालुकाष्टी- लिंपणगाव मध्यावर असणारे रेल्वे गेटवर अपघात ग्रस्त रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. दरम्यान रविवारी 31 डिसेंबरकाष्टी- लिंपणगाव श्रीगोंदाकडे मार्गस्थ होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची मालिका दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या रस्त्या अपघातात लिंपणगावचा युवक नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच अनिकेत जगताप या युवकाचा मोटरसायकल कारच्या अपघातात भीषण अपघात होऊन जागीच मृत्यू झाला होता. तो अपघात देखील अंगावर शहारे आणण्यासारखाच होता. दरम्यान त्याच दिवशी त्याच रात्री नववर्षाच्या पूर्वसंध्येला काष्टी लिंपणगाव रेल्वे गेटवर तीन- कारचा भीषण अपघात होऊन सुदैवाने जीवित हानी टळली सदरचा अपघात देखील सिनेमा स्टाईलने अत्यंत अंगावर शहारे आणण्यासारखा होता.
मिळालेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर रोजी रात्री काष्टी लिंपणगावचे रेल्वे गेट बंद असल्याने सदर वाहन चालकाला रेल्वे गेट बंदचा अंदाज न आल्याने लिंपणगाव च्या दिशेने रेल्वे गेटला सदर कार आदळून तीन जीव घेणे पलट्या मारल्या सुदैवाने सर्वजण त्यातील प्रवासी व वाहन चालक सुखरूप बालन बाल बचावले.
या नववर्षाच्या पूर्वसंध्येला लिंपणगाव काष्टी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या वेगवेगळ्या भीषण अपघाताची मालिका जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून सविस्तर लिखाण करून रेल्वे प्रशासनासह तालुका व जिल्हा प्रशासन या सर्वांच्या नजरेत पुढे आणले. या वृत्ताची दखल घेत रेल्वे प्रशासनाने तात्काळ मंगळवारी रेल्वे गेट परिसरातील नादुरुस्त रस्त्याचे डांबरीकरण करून मजबुतीकरण करण्यात आले. व योग्य ती खबरदारी घेण्यात आली. वास्तविक पाहता या काष्टी लिंपणगाव रेल्वे गेटवर उड्डाणपुलाची मंजुरी देखील मिळालेली असून, लवकरच या उड्डाण पुलाचे काम सुरू होणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांकडून समजले. या प्रश्न नगर दक्षिणचे खासदार डॉ सुजय विखे पाटील या महत्त्वाच्या उडण पुलाच्या कामा संदर्भात देखील आढावा घेत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी अपघात ग्रस्त महामार्गावर होणारे दिवसेंदिवस भीषण अपघात टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे देखील समजले. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार तीन-चार वर्षांपूर्वी मुंबई उस्मानाबाद काष्टी लिंपणगाव श्रीगोंदा कडे मार्गस्थ होणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु आहे. त्याबरोबरच अपघाताची मालिका देखील तितक्याच प्रमाणात दिसून येत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर अनेक वाहन चालक दुचाकीस्वार यांच्यासह काही बेभानपणे वाहन चालवणाऱ्या युवकांचा देखील मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसत आहेत. अनेक निष्पाप लोकांचा या महामार्गावर बळी जात असल्याने रस्ते विकास महामंडळाने काष्टी ते श्रीगोंदा पर्यंत मध्यभागी डिव्हायडर बसून होणारे अपघात टाळावेत अशी मागणी देखील वाहनचालक व प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे.
वाचक क्रमांक :