अखेर प्रदीर्घ संघर्षानंतर लिंपणगावच्या वंचित शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी सोडले शेतकऱ्यांमधून समाधान

By : Polticalface Team ,03-01-2024

अखेर प्रदीर्घ संघर्षानंतर लिंपणगावच्या वंचित शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी सोडले शेतकऱ्यांमधून समाधान
लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगावच्या शेतकऱ्यांना कुकडीचे संबंधित अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये पाणी वाटपा संदर्भात योग्य तोडगा निघाल्याने अखेर आज बुधवारी बारा वाजता अखेर वंचित शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी सोडण्यात आले. या प्रश्न वंचित शेतकऱ्यांनी कुकडीचे अधिकाऱ्यांनी मौलिक सहकारी केल्याबद्दल आभार मानले आहेत. दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात रब्बी हंगामासाठी कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले. त्यामध्ये पाण्यासंदर्भात सतत चर्चेत असलेले लिंपणगावच्या चारीला पाणी सोडण्यासाठी संबंधित कुकडीचे अधिकारी व पाणी वापर संस्थेमध्ये समन्वय नसल्याने लिंपणगावच्या शेतकऱ्यांना पाणी सोडण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. रब्बी हंगामाचे पहिलेच हक्काचे पाणी लिंपणगावच्या शेतकऱ्यांना मिळाले नसल्यामुळे लिंपणगावचे शेतकरी चांगलेच आक्रमक होऊन कुकडीचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख व विसापूर जलसिंचन विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री वाळके यांना मंगळवारी कार्यालयात घेराव घालून पाणी सोडण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र अधिकाऱ्यांनी लिंपणगावच्या पाणी वापर संस्थेने मागणी फॉर्म भरून न दिल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला गेला. या प्रश्न लिंपणगावचे माजी सरपंच अरविंद कुरुमकर, युवा नेते निलेश कुरुमकर, दादासाहेब कुरुमकर, अशोक होले, अशोक वाल्हेकर दीपक वाल्हेकर आदींसह अन्य शेतकऱ्यांनी संबंधित कुकडीचे अधिकार्‍यांना घेराव घालून पाणी सोडण्यासाठी ठाम भूमिका घेतली. मात्र अधिकाऱ्यांनी थकबाकीची वेगळीच भूमिका घेत पाच लाख रुपये पाणी वापर संस्थेकडे येणे बाकी असल्याने पाणी सोडता येणार नाही. असे उपविभागीय अधिकारी श्री वाळके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही प्रत्येक वेळेस आवर्तन कालावधीत भरणी झाल्यानंतर पाणी वापर संस्थेकडे भरणा करत असतो. त्यामध्ये आमचा दोष काय? असा सवाल माजी सरपंच अरविंद कुरुमकर यांनी अधिकाऱ्यांना केला, तर युवा नेते निलेश कुरुमकर यांनी लिंपणगावच्या चारी वर फक्त 48 हेक्टर क्षेत्र ओलीचा खाली असताना अधिकाऱ्यांनी 285 हेक्टर क्षेत्र कोणाेचे दाखवले. आमच्या माथी हा ब्रूदंड कशासाठी असा सवाल करत सदरची थकबाकी पाणी वापर संस्थेकडूनच आपण वसूल करावी. आणि आम्हाला रब्बी हंगामाचे हक्काचे पाणी मिळाले पाहिजे अशी आक्रमक भूमिका घेतली. या प्रश्नावर मात्र अधिकारी चांगलेच निरुत्तर झाले. अखेर कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी या प्रश्नावर तोडगा काढत बुधवारी पाणी सोडण्याचा निर्णय दिल्याने या प्रकरणावर पडदा पडला.
त्यामुळे बुधवारी दुपारी बारा वाजता लिंपणगावच्या शेतकऱ्यांना तातडीने पाणी सोडण्यात प्रारंभ करण्यात आला. दरम्यान लिंपणगावच्या शेतकऱ्यांनी जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांना या पाणी प्रश्नाची सविस्तर कैफियत सांगितल्यानंतर त्यांनी विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून सविस्तर लिखाण करून संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. एवढ्यावरच न थांबता पत्रकार कुरुमकर यांनी दूरध्वनी द्वारे संबंधित कार्यकारी अभियंता श्री देशमुख व उपविभागीय अधिकारी श्री वाळके यांच्याशीही संपर्क साधून हक्काच्या पाण्यासाठी योग्य भूमिका अधिकाऱ्यांसमोर मांडली. त्यामुळे लिंपणगावच्या वंचित शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत कुकडीच्या पाण्यासंदर्भात सविस्तर लिखाण करून एक सामाजिक जबाबदारी पार पाडल्याबद्दल लिंपणगावच्या शेतकऱ्यांनी पत्रकार कुरुमकर यांना धन्यवाद दिले आहेत. लिंपणगावच्या या वंचित शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत कुकडीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी शेवटी ताठर भूमिका न घेता पाणी सोडल्याबद्दल शेतकऱ्यांनी कुकडीचे कार्यकारी अभियंता श्री देशमुख व उपविभागीय अधिकारी श्री वाळके यांचेही आभार मानले आहे.
आता यापुढे पाणी वापर संस्था पदाधिकारी बरखास्त करून कार्यक्षम नूतन पदाधिकारी निवडावेत जेणेकरून कुकडीच्या अधिकाऱ्यांमध्ये व पाणी वापर संस्थेमध्ये समन्वय कायम राहून एकही शेतकरी यापुढे आवर्तनापासून वंचित राहणार नाही याची आपण सर्वजण काळजी घेऊ असे आश्वासन कार्यकारी अभियंता श्री देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष