करमाळा शिवसेना (उद्धव ठाकरे)शहर अध्यक्षपदी संजय शिंदे यांची निवड
By : Polticalface Team ,04-01-2024
करमाळा ता प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी निवडी मुंबई येथील शिवसेनाभवन येथे करण्यात आल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खा विनायक राऊत,मराठवाडा विभाग संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर, सोलापूर जिल्हा संपर्क नेते अनिल कोकीळ,करमाळा ता संपर्क नेते राजु राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या मिटींगमध्ये ह्या निवडी झाल्या व सामना या वर्तमानपत्रकामध्ये ह्या निवडी जाहीर झाल्या आहेत.
ह्या निवडीमध्ये सोलापूर (पंढरपूर विभाग) उपजिल्हाप्रमुख म्हणून शाहूंराव फरतडे,विधानसभा प्रमुख वैभव जयवंतराव जगताप,करमाळा शहराध्यक्ष संजय (नेते) शिंदे,ता संघटक प्रवीण कटारिया यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
या निवडीमुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे या सर्व पदाधिकारी यांचे स्वागत तालुका प्रमुख सुधाकर लावंड यांनी केले आहे
वाचक क्रमांक :