सर्वांना भयमुक्त काम करता आले तरच लोकशाही टिकेल,,,, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप

By : Polticalface Team ,04-01-2024

सर्वांना भयमुक्त काम करता आले तरच लोकशाही टिकेल,,,, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 - सध्या सामाजिक आणि राजकीय लोकशाहीच्या यशापयशाबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंकाकुशंकानी गर्दी केली आहे. देशाचे सार्वभौमत्व पाहता आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. जनता सार्वभौम आहे, याची जाणीव आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांना करून देण्याची वेळ समीप आली असून सर्वांना भयमुक्त काम करता आले तर लोकशाही टिकेल असे मत संवाद दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) युवक सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी केले. ते माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करमाळा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना अभयसिंह जगताप म्हणाले की, २०२४ मध्ये माढा लोकसभेसाठी उमेदवारीसाठी नव्हे तर विचारांची लढाई आहे. हा देश शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारा असून शरदचंद्रजी पवार यांना मानणारा हा मतदारसंघ आहे. यंदा या लोकसभा निवडणुकीत निश्चित परिवर्तन घडेल. यासाठी पवार साहेबांच्या पाठीशी इथली जनता ताकद उभा करेल. यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा या उदात्त हेतूने हे शिवधनुष्य मी हाती घेतले आहे. किंबहुना पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या उमेदवाराला लोकसभेसाठी उभा करेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी एक कार्यकर्ता या नात्याने मी घेत असून करमाळा, माढा, सांगोला, फलटण, माळशिरस, माण, खटाव या मतदार संघात इंडिया आघाडीला मानणारा मतदार बांधव प्रचंड असून स्वहितासाठी नेते मंडळी इतर पक्षांत गेली असली तरी सामान्य जनता मात्र आज ही पवार साहेबांच्या पाठीशी भक्कम असल्याने माढा लोकसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे.
लोकशाही कल्पनेच्यामागे कायद्याचे अधिराज्य, नैसर्गिक हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही गतिमान तत्त्वे आहेत. त्याला तिलांजली सध्या मिळत आहे. सामाजिक लोकशाहीचा पाया खंबीर केला तरच राजकीय लोकशाही टिकेल. स्वातंत्र्य, समता व बंधुता या तीन जीवनतत्त्वातील एक तत्त्व गळाले तरी सर्व लोकशाहीचा हेतूच विफल झाल्यासारखे होते. राजकारणातील विशिष्ट लोकांचा दरारा व मक्तेदारी तसेच सामाजिक विषमता हे दृश्य पालटले पाहिजे. असे झाले नाही तर विषमतेची झळ लागलेला वर्ग राजकीय लोकशाहीचे कवच फोडून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देशाची अर्थव्यवस्था व लोकशाही खिळखिळी बनवणाऱ्या मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला बेकारी, महागाईच्या खाईत लोटले आहे. सर्वसामान्य जनतेला आधार देत व देश वाचविण्यासाठी दुसरा स्वातंत्र्य लढा उभारण्याची गरज असल्याचे मत अभयसिंह जगताप यांनी यावेळी व्यक्त केले.
या संवाद दौऱ्यादरम्यान जगताप यांनी आदीनाथचे माजी चेअरमन प्रदीप आबा जाधव पाटील, माजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी, प्रशांत ढाळे, सुनील सावंत, टायगर ग्रुपचे तानाजीभाऊ जाधव, प्रविण कटारिया, प्रतापराव जगताप आदींच्या भेटी घेतल्या. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, शहराध्यक्ष शिवराज जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन चवरे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण काका जगताप, युवक शहराध्यक्ष आमिर तांबोळी, किसान सेल तालुका अध्यक्ष सचिन नलवडे, तालुका सरचिटणीस समाधान शिंगटे, अजहर जमादार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.