राजेंद्र प्रसाद विद्यालयात क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहात साजरा

By : Polticalface Team ,04-01-2024

राजेंद्र प्रसाद विद्यालयात क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहात साजरा लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयामध्ये क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कायदा व आरोग्य संदर्भात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कायदा व आरोग्याची ज्ञान असावे यासाठी भरीव असे मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई दरेकर या होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधीतज्ञ अॅड. सुनिता पल्लीवाल आणि श्रीगोंदाच्या प्रसिद्ध डॉ. सुवर्णाताई होले आदींनी विद्यार्थ्यांना कायदा व आरोग्य संदर्भात विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. सुवर्णाताई होले मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, बुरसटलेल्या विचारांना मागे सारून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्री शिक्षणाचे भरीव कार्य केले. त्यांनी प्रगतीचा राजमार्ग स्त्रियांसाठी उपलब्ध करून दिला. उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रत्येकामध्ये क्षमता महत्त्वाची असते. असे सांगून त्यांनी आरोग्याची व्याख्या सांगताना शारीरिक व भावनिक आरोग्य चांगले असावे, समोरच्याविषयी चांगले विचार अंगीकरावे, मनाची स्वच्छता असावी, योग्य वेळी योग्य आहार घ्यावा, तृणधान्याचा समावेश असावा कारण त्यात जास्त जीवनसत्व असतात असे सांगून त्यापुढे म्हणाले की, आरोग्य उत्तम असेल तर शरीर संपदा ही तंदुरुस्त राहते. आहाराकडे लक्ष दिल्यास शरीर सुदृढ बनते ,असे सांगत त्यांनी लिव्हरशी संबंधित असणारे आजार याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विधीतज्ञ ॲड सुनिता पल्लीवाल यांनी शिक्षणाच्या कायद्यातील नियम, आई-वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे संस्कार, कायद्याचे वाचन, वर्तमानपत्रातील वाचन, बाललैंगिक कायदा, मुलींची छेड काढली तर एखादी घटना घडून गेल्यानंतर त्याचे होणारे दुष्परिणाम, सहकार्यातून मित्रत्वाकडे वाटचाल कशी करावी, एखादी घटना घडल्यास तक्रार निवारण समितीकडे नोंद करावी, विशेषता तक्रार ही लेखी स्वरूपात असावी, पोक्सो कायद्याअंतर्गत नोकरीत सुद्धा अडचणी येतात तर शेतीशी संबंधित सातबारा उताऱ्याचे महत्त्व सांगितले. याबरोबरच मुलींनी देखील मानसिक विकृतींना बळी पडू नये असे विविध कायद्याअंतर्गत असणारे सल्ले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी अॅड. पल्लीवाल यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई दरेकर यांनी विद्यालयाच्या आतापर्यंतचा वाटचालीचा चढता आलेख व विद्यालयात आयोजित केलेले विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा, एसएससी परीक्षेचा आतापर्यंतचा यशस्वी निकाल, याबरोबरच विद्यालयाची शैक्षणिक दृष्ट्या होत असलेली घौडधौड याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन.
या कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक विद्यालयाचे उपशिक्षक मच्छिंद्र मडके यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षक नारायण झेंडे यांनी केले तर आभार श्रीमती सविता शितोळे मॅडम यांनी केले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष