काँग्रेसला लोकसभेची एक जागा हवीच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस- देशमुख
By : Polticalface Team ,04-01-2024
लिंपणगाव दि.४(प्रतिनिधी) - महाविकास आघाडीचा विचार करता सध्या जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसला शिर्डी अथवा नगर लोकसभा मतदारसंघांपैकी एक तरी जागा मिळालीच पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी असून तसा प्रस्ताव प्रदेश व राष्ट्रीय समितीकडे पाठविणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांनी दिली.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलताना देशमुख म्हणाले, नगर जिल्हा काँग्रेसच्या संस्कृतीचा आहे. आजही जिल्ह्यात काँग्रेसचा मतदार पक्षाच्या पाठीशी उभा आहे, त्याला पक्षाला मते देण्याची संधी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडीत शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेसकडे होती. आता शिवसेनेच्या सहभागाने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीमुळे जागावाटपाची समीकरणे बदलली आहेत. तरीही जिल्ह्यातील लोकसभेची कोणतीही एक जागा आम्हाला मिळावी, अशी आमची मागणी आहे. पक्षाकडे दोन्ही जागांसाठी सक्षम उमेदवार आहेत, जी जागा लढविण्याची संधी मिळेल, तिथे विजय मिळण्याची आम्हाला खात्री आहे.
देशमुख पूढे म्हणाले, महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये अंतर्गत फुटीचा विचार करता सध्या काँग्रेस आघाडीतील सर्वांत ताकदवान पक्ष आहे. तीच भूमिका ठेऊन जागावाटप होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. सध्या सगळीकडे जनतेतून काँग्रेसचा आवाज ऐकू येतोय, पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन त्याचा पक्षासाठी फायदा करून घेतला पाहिजे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतल्यास पुन्हा एकदा काँग्रेसला सुवर्णकाळ येईल, असा विश्वास विनायक देशमुख यांनी व्यक्त केला.
यावेळी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नेटके, भाऊसाहेब काळे उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी