कुकडीच्या पाण्याचे खाजगीकरण शेतकऱ्यांच्या मुळाशी शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी

By : Polticalface Team ,05-01-2024

कुकडीच्या पाण्याचे खाजगीकरण शेतकऱ्यांच्या मुळाशी शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात 132 मायनर मधून आवर्तन सोडण्यात येते. परंतु दोन-तीन वर्षापासून या 132 मायनरचे पाणी शासनाने ऑनलाईन पद्धतीने टेंडर काढून ठेकेदाराकडे पाणी सोपवले असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हक्काच्या आवर्तनापासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्याचेच उदाहरण लिंपणगावच्या शेतकऱ्यांना या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली होती. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जलसिंचन विभागाकडे अनेक वर्षापासून पद भरती बंद असल्यामुळे या आवर्तन कालावधीत संबंधित ठेकेदाराकडून प्रत्येक चारीवर पाणी वापर संस्थेकडे पाणी वाटपाचे नियोजन सोपवले. परंतु आवर्तन कालावधीत पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळते का नाही याकडे मात्र डुंकूनही पाहत नाही. ठेकेदार मात्र सात ते आठ तासात फक्त चारीला पाणी सोडतात आणि पुन्हा पाणी बंद करतात. वास्तविक पाहता कुकडी लाभक्षेत्रातील रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन महत्त्वाचे समजले जाते. शेतकऱ्यांनाही मोठी अपेक्षा या आवर्तनाची लागलेली असते. परंतु या पाण्याचे खाजगीकरण केल्यामुळे संबंधित अधिकारी मात्र कातडी बचाव अशी भूमिका घेतात. पुरेसे पाणी न मिळाल्यास वाद मात्र ठेकेदार आणि शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अधिकारी मात्र सही सलामत बाजूला राहतात याकडे देखील शासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोणत्या चारीवर किती? क्षेत्र ओलिताखाली आहे? याकडे देखील संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला कागदपत्रे पटवून देण्याची आवश्यकता आहे. परंतु संबंधित ठेकेदार मात्र प्रत्येक चारीवर वाढीव क्षेत्र दाखवून पाणी वापर संस्थेच्या माथी मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टी आकारतात त्याचा फटका मात्र शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे 132 मायनर चारीवर पाणी वाटपाचे धोरण मात्र शेतकऱ्यांच्या चांगलेच मुळाशी आल्याने शासनाने फेरविचार करून पाण्याचे खाजगीकरण न करता पाणी वापर संस्थांकडे पाणी हस्तांतरित करण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांची मागणी आहे अन्यथा यापुढे पाण्यासाठी संघर्ष मात्र ेअसणार आहे. असे देखील शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
श्रीगोंदा तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा तर ,ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामाची पिके ही धोक्यात
श्रीगोंदा तालुक्यात अनेक भागांमध्ये गुरुवारी मध्यरात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काटणी करून उघड्यावर ठेवलेल्या कांद्याचे मात्र अतोनात नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. तर रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक समजले जाणारे ज्वारी हरभरा गहू या पिकांचा टचदार दाना भरत असतानाच त्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे ज्वारीच्या कणसावर लालसर रंगाच्या रोगाचा प्रादुर्भाव हरभरा पिकांवर देखील अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. दरम्यान एकीकडे श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या घोड कुकडी मधून श्रीगोंदा तालुक्यात आवर्तने सुरू आहेत. अनेक शेतकऱ्यांची धडपड ही उभ्या पिकांना पाणी देण्याची असतानाच अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काटणी करून ठेवलेला कांदा सुरक्षितच झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी रात्रभर उठा ठेव सुरू झाली. त्यामध्ये अनेकांचा उघड्यावर ठेवलेला कांदा भिजल्याने या कांद्याचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
एकीकडे कांद्याचे भाव कोसळत असताना निसर्ग मात्र स्वच्छ वातावरण ठेवताना दिसत नाही. त्याचा दुष्परिणाम मात्र रब्बी पिकांवर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो त्यामध्ये कधी ढगाळ वातावरण तर कधी धुळीचे साम्राज्य त्यामुळे उभ्या पिकांना हे वातावरण निश्चितच दूषित ठरू शकते. विशेषता लागवड केलेल्या कांद्याचे या ढगाळ वातावरणामुळे मोठे नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाठीवर पंप घेऊन विविध प्रकारचे औषध फवारणी करताना कांदा उत्पादकांची मोठी दमछाक होताना दिसत आहे या रोगप्रतिबंधात्मक औषधांच्या किमती ही गगनाला भिडले आहेत. पदरी मात्र घोर निराशा होत असल्याचे कांदा उत्पादकांमधून बोलले जात आहे. कांदा उत्पादकांच्या म्हणण्यानुसार वातावरणातील बदलामुळे मोठा आर्थिक बुरदंड होताना दिसतो. दरम्यान शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही जगाच्या कल्याणासाठी संतांची विभूती जगाचा पोशिंदा म्हणू आमच्याकडे सर्व जग पाहते. रात्रंदिवस कावड कष्ट करून पिकविलेल्या मालाला योग्य किंमत मिळेल ही अपेक्षा बळीराजा डोळ्यासमोर ठेवतो. मात्र ज्या वेळेस पिकवलेले उत्पन्न मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर मात्र आमच्या मालाची कवडीमोल किंमत होते .परंतु कोणत्याच मालाला हमीभाव नसल्याने कवडीमोल किमतीत कष्टातून पिकवलेले उत्पन्न व्यापारी मात्र मालामाल होतात. शेतकऱ्यांना मात्र काबाड कष्ट करून दारिद्र्याचे जीवन जगावे लागते. ही मोठी शोकांतिका असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष