टाकळी येथे तळ्यातील तीन टन मांगुर  मासा नष्ट : मस्यविभागाची कारवाई

By : Polticalface Team ,05-01-2024

टाकळी येथे तळ्यातील
तीन टन मांगुर  मासा नष्ट : मस्यविभागाची कारवाई करमाळा: तालुका प्रतिनिधी तालुक्यातील पश्चिम भागातील उजनी जलाशयाच्या परिसरातील टाकळी येथील तळ्यातील तीन टन मांगुर मासा नष्ट करण्यात आला आहे.
मस्यविभागाचे सहाय्यक आयुक्त पि.जी विरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे .  करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात टाकळी येथे दोन तळ्यातील तब्बल तीन टन मांगुर मासा मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप वीरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नष्ट केले आहेत. या परिसरात अजून अनेक प्रतिबंधित मांगुर मासा संवर्धन तलाव चालू असून या ठिकाणीही कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती पि.जी.विरकर यांनी पत्रकारांना दिली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की गोपनीय माहितीनुसार टाकळी परिसरात  प्रतिबंधीत मांगुर मस्यपालन व मत्स्यसंवर्धन तलाव असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे मस्य संवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त पी.जी. वीरकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक मस्य विभागीय अधिकारी श्रीमती आर एस रावणगावे, व्ही.एस. वाघमोडे, एस.टी. घाडगे, एस. आर. मगदूम, के. एन. सौदाने, डि, बी. सरडे आदी अधिकारी व भीमा उपसा सिंचन विभागाचे कर्मचारी यांनी टाकळी भागात तलावांची तपासणी केली. यामध्ये ऋषिकेश करचे ,गोरख मोरे यांच्या तलावात मांगुर मास्यांचे संवर्धन होत असल्याचे आढळून आले. यावेळी या पथकाने  या तलावाच्या शेजारीच खड्डा घेऊन तब्बल तीन टन मांगुर मासा गाडून नष्ट करण्यात आला. यावेळी हवालदार मारुती रणदिवे, प्रशांत गायकवाड, पोलीस पाटील सोमनाथ कुचेकर आदी अधिकारी उपस्थित होते. मत्स्य विभाग सोलापूर, पाटबंधारे विभाग, तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. मांगुर मत्स्यपालन करणार्‍यावर कारवाई होत असतानाही उजनी जलाशयासाठी मोठ्या प्रमाणात मांगुर माशांचे बेकायदेशीर संवर्धन चालू आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारा व्यवसाय असल्यामुळे मांगुर मासे संवर्धनाला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र या मांगुर माशाला कोंबड्याची घाण, कुजलेलं, सडलेले कत्तलखान्यातील मांस, जनावरांचे मांस आदि खाद्य म्हणून  मांगूर माशांना टाकण्यात येत असल्याने पर्यावरणाचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेले सिद्ध झाले  आहे . याची गंभीर दखल राष्ट्रीय हरित लवादाने घेतलेली आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने हे घातक असलेने मांगूर माशाच्या उत्पादनावर व विक्रीवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार मांगुर माशाची संवर्धनावर कायद्याने बंदी घातलेली असतानाही काही जण मांगुर माशांचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे  ही कारवाई केली जात आहे. या माशांमध्ये झिंक, कॅडमियम, आरेसीनिक असे विषारी पदार्थाचे संक्रमण आढळून येत असल्याने व या मांगुर माशांमध्ये दूषित व हानिकारक बॅक्टेरिया असल्याने मानवाच्या आरोग्यावर याचा मोठा धोका जाणवत आहे. त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचेही तज्ञांचे मत आहे. हा मांगुर मासा डबक्यात, चिखलात, गटारात, घाण पाण्यात वाढतो.
थाय नावाचा मांगुर मासा तर पाण्याशिवाय ही राहू शकतो. या सर्व बाबीचे राष्ट्रीय हरित लवादाने अभ्यास करून मांगुर माशाच्या उत्पादनावर व विक्रीवर बंदी घातलेली आहे. मांगुर मासा हा आरोग्यासाठी घातक आणि स्थानिक प्रजातीचे मासे नष्ट करणारा असतानाही  मांगुर मासे पालनाची बेकायदा शेती उजनी पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी चालू आहे.  अवघ्या तीन महिन्यांमध्ये याची मोठी वाढ होत असल्याने याकडे मत्स्य पालक आकर्षिले जात आहेत. मात्र मानवी आरोग्याच्या व पर्यावरणाच्या दृष्टीने ते हानिकारक असल्याने त्याला शासनाने बंदी घातली आहे. 
उजनी जलाशयाकाठी बेकायदेशीर रित्या चालू असलेल्या मांगुर मत्स्य संवर्धन तलावावर कारवाई  होत आहे.मानवाला तसेच पर्यावरणाला मांगुर माशामुळे धोका निर्माण झाला आहे .त्यामुळे मांगुर मांशाचे उत्पादन व विक्रीला बंदी घातली आहे. त्यामुळे मांगुर व्यवसाय करणार्‍यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. ..प्र.ग. वीरकर, सहाय्यक आयुक्त, मत्स्य विभाग सोलापूर
टाकळी येथे बेकायदेशीर रित्या चालू असलेल्या  मांगुर मस्य तलावावर कारवाई करून तीन टन प्रतिबंधित मांगुर मासा मस्यविभागाने नष्ट केला.यावेळी सहाय्यक आयुक्त वीरकर व मस्यविभागाचे कर्मचारी, अधिकारी ,पोलिस आदि

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष