ऑल इंडिया नॅशनल डान्स स्पर्धेत शिवाजीराव नागवडे डेफोडील स्कूलच्या विद्यार्थ्यांचे अप्रतिम नृत्य
By : Polticalface Team ,08-01-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- मिनिस्टरी ऑफ कल्चरल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या वतीने औध, पुणे येथे नुकतीच ९ वी ऑल इंडिया नॅशनल डान्स स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेमध्ये शिवाजीराव नागवडे डेफोडील्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत अप्रतिम नृत्य प्रकार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवत नेत्रदीपक यश संपादन केले.
जुनिअर कॅटेगिरी मध्ये प्रज्ञा शिंदे या विद्यार्थिनीने भारतीय लोकनृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम तर तनिष्क ठवाळ याने हीप हॉप नृत्य प्रकारात दुसरे पारितोषिक मिळवले.
प्रसंगी विद्यालयाचे डान्स कोरिओग्राफर सुमेध आणि प्रणाली गजभिये यांना उत्कृष्ट कोरिओग्राफर म्हणून सन्मानित करण्यात आले.
या दुहेरी यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे, निरीक्षक एस.पी.गोलांडे सर, मुख्याध्यापिका दुलानी मॅडम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :