पत्रकारांनी जागल्याची भुमीका घेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली लेखणी चालवावी -मंदार फणसे

By : Polticalface Team ,09-01-2024

पत्रकारांनी जागल्याची भुमीका घेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली लेखणी चालवावी -मंदार फणसे करमाळा प्रतिनिधी लोकशाहीमध्ये समाजाला जागे करण्याचे काम पत्रकार बांधवांना करावे लागत असून भयभयीत समाजाला दिशा दाखवण्यासाठी जागल्याची भुमीका घेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली लेखणी चालवावी असे मत जेष्ठ पत्रकार आय बी एन लोकमतचे माजी कार्यकारी संपादक मंदार फणसे यांनी व्यक्त केले.
प्रा.रामदास झोळ सर फाऊडेंशन करमाळा यांच्यावतीने बाळशास्त्री जांभेकर जयंती पत्रकार दिनानिम्मित करमाळा तालुक्यातील पत्रकार बांधवाचा सपत्निक सन्मान सत्कार सोहळा स्नेह मेळावा राजयोग हाॅटेल करमाळा येथ संप्पन झाला .यावेळी व्यासपीठावर दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सचिव माया झोळ मॅडम दैनिक सकाळचे माजी संपादक श्रीराम पवार करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रशासकीय प्रमुख डाॅ.विशाल बाबर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना मंदार फणसे म्हणाले की सध्याच्या युगामध्ये मोबाईल फेसबुक व्हाट्सअप ट्विटर यांच्या माध्यमातून बातमीमध्ये ब्रेकिंगची स्पर्धा चालू असून अशा परिस्थितीमध्येही समाज मनाचे भान जपत समाजाला अपेक्षित असणाऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधून ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण लेखणीच्या माध्यमातून आवाज उठून ते प्रश्न मार्गी लागेपर्यंत बातमीमधुन पाठपुरावा करणे गरजेचे आहे.समाजात घडणाऱ्या बदलाबरोबर समाजात असणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडून समाजाला न्याय देण्याचे काम केले तर समाजाचे पाठबळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे.बदलत्या ऋतुमानाचा हवामान बदलाचा फटका आपणाला बसणार असून त्यामुळे पाण्याअभावी अन्नधान्याचे उत्पादन ही घटणार आहे.
याचे थेट परिणाम आपणा सर्वांना भोगावे लागणार आहे . नुसता पाऊस पडला नाही पडला म्हणून चालणार नाही पावसामुळे होणाऱ्या परिणामाचा विचार करून त्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी कशाची गरज आहे. याची दृष्टी समाजाला व्यवस्थेला देण्याचे काम पत्रकाराला करावे लागणार आहे.
जगाला विकासाला दिशा देणारा रोबोट पेक्षाही वेगवान असणारा मानवी मेंदू हा पत्रकाराचा असून पत्रकारांनी वर्तमान परिस्थितीनुसार भविष्याचा वेध घेत समस्याचा उकल करत विकासात्मक पत्रकारिता केली तर या समाजाचे कल्याण होईल. यासाठी पत्रकाराची जबाबदारी मौलाची आहे. प्रा. रामदास झोळ सर यांनी आयोजित केलेला पत्रकार कुटुंब सन्मान सोहळा हा उपक्रम स्तुत्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात करमाळा तालुक्याच्या विकासाबाबत प्रा.रामदास झोळ सरांची भुमिका महत्त्वपुर्ण असुन करमाळा तालुक्याचे यशस्वीपणे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्याने करमाळा तालुक्याचे भवितव्य उज्वल असल्याचे सांगितले. याप्रसंगी दैनिक सकाळचे माजी संपादक श्रीराम पवार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या युगामध्ये पत्रकारितेमध्ये वेगवान डिजिटल मीडियाची प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डिजिटल माध्यमे समाजमन व्यापून टाकत आहेत. या माध्यमांवर लोक मते मांडतात. मात्र तुम्ही पत्रकार समाजाला विचार देता. ही बदलत्या काळाची पावले आपण ओळखायला हवीत. या काळाचे संक्रमणही मागे जाईल. मात्र वर्तमानपत्र टिकून राहतील. कारण वर्तमानपत्रे विचार करायला भाग पाडतात. डिजिटल माध्यमांमुळे वृत्तपत्रांचा खप कमी झाला, असे म्हटले जाते. मात्र वृत्तपत्रे वाचणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पानाच्या ठेल्यापासून भारतात सर्वत्र वर्तमानपत्राचा वाचकवर्ग आहे. वस्तूनिष्ठ लेखन करणारे पत्रकार आहेत. जोपर्यंत ही वस्तूनिष्ठ पत्रकारिता टिकून राहील, तोपर्यंत लोकशाहीचे भवितव्य सुरक्षित राहील. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे, चौथ्या स्तंभाचे, पर्यायाने लोकशाहीचे रक्षण प्राणपणाने केले पाहिजे.. वास्तवतेचे भान ठेवुन वर्तमानाचा परिस्थीतीचा विचार करून बातमी मागची बातमी करून समाजाला दिशा दाखवून राजकीय व्यक्तींना अंजन घालण्याचे काम आपण केले तर समाजातील प्रश्नाची सोडवणुक होऊन पत्रकारीता क्षेत्रामध्ये भविष्य उज्वल आहे.
यावेळी प्रा रामदास झोळसर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करत असून सर्वसामान्य जनता शेतकरी युवक महिला यांचे प्रश्नांची सोडवणूक करणार आहे. यावेळी करमाळा तालुका शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध करण्यासाठी येत्या काही वर्षांत व्यावसायिक अभ्यासक्रम महाविद्यालय सुरू करणार असुन युवक रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे म्हणाले करमाळा तालुक्यातील विविध प्रश्नाविषयी आवाज उठवुन ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी झोळ सरांचे कार्य प्रेरणादायी असुन विकासाची दृष्टी असलेले नेतृत्वाला जनतेचे पाठबळ मिळत आहे.अशा जनसेवकाला पत्रकार बांधवाचे कायम सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे सचिव नासिर कबीर अशोक नरसाळे दिनेश मडके ,आशपाक सय्यद, अलीम शेख अशोक मुरूमकर, सचिन हिरडे शितलकुमार मोटे, विशाल घोलप सचिन जव्हेरी ,संजय शिंदे, जयंत दळवी, बाळासाहेब भिसे सर,राजेश गायकवाड सुहास घोलप सिध्दार्थ वाघमारे हर्षवर्धन गाडे, विशाल परदेशी नागेश चेंडगे किशोर शिंदे तुषार जाधव ,सागर गायकवाड, गिरीश पाटील,दिपक फरतडे, तात्या सरडे,अंगद भांडवलकर दस्तगीर मुजावर, संजय मस्कर, संजय कुलकर्णी, नितीन घोडेगावकर, सुयोग झोळ, संतोष केसकर,बाळासाहेब सरडे, सचिन बिचीतकर ,नानासाहेब पठाडे,उमेश पवळ, जयंत कोष्टी, राहुल रामदासी,अतुल बोकन ,अंगद देवकते धर्मराज दळवी यांचा मंदार फणसे श्रीराम पवार प्रा रामदास झोळसर माया झोळ मॅडम यांच्या हस्ते सपत्नीक शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन सौ.संगिता खाडे दराडे मॅडम स्वागत व आभार विक्रम दास सर यांनी मानले. प्रा.प्रा.रामदास झोळसर फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रकार बांधवांचा भव्य कार्यक्रमांमध्ये यथोचित मानसन्मान सत्कार केल्याबद्दल त्यांचे पत्रकार बांधवांच्यावतीने कौतुक होत आहे.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी दत्तकला शिक्षण संस्था सर्व शिक्षक कर्मचारी स्टाॅफ प्रा. रामदास झोळसर फाऊंडेशनचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.