नागवडे इंग्लिश मीडियम चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. "चिमुकल्यांची दिल खेचक अदाकारी, पालकांचा उदंड प्रतिसाद."

By : Polticalface Team ,12-01-2024

नागवडे इंग्लिश मीडियम चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
लिंपणगाव (प्रतिनिधी)- तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित, शिवाजीराव नागवडे डेफोडील्स स्कूल ( सी.बी.एस.इ.) आणि कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कलागुणांच्या सादरीकरणाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली.प्रसंगी चिमुकल्यांनी सादर केलेल्या नटरंग, कोळीगीत, घुमर, जोगवा आणि फॅशन शो ने उपस्थितांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एस.पी.प्रमोद सोनवणे यांनी, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली असल्याचे विषद करून दर्जेदार शिक्षण मिळाले तरच आपली ग्रामीण भागातील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये टिकतील असे प्रतिपादन करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण नागवडे इंग्लिश मीडियम च्या माध्यमातून श्रीगोंदा येथे मिळत आहे हे पाहून शालेय प्रशासनाचे कौतुक केले.प्रसंगी अनुराधाताई नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी ताई पोटे, उपनगराध्यक्षा ज्योतीताई खेडकर, शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष डॉ. विक्रम भोसले यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्राविण्य प्राप्त नृत्य व क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, शैक्षणिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणारे विद्यार्थी आणि शिक्षक यांना गौरवण्यात आले.
कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, स.शि.ना.नागवडे सह.साखर कारखान्याचे संचालक सुभाष काका शिंदे, सुनील भोस, प्रशांत दरेकर, सखाराम औटी बाजार समितीच्या संचालक नंदिनी काकी वाबळे, नगरसेविका सीमाताई गोरे, गयाताई सुपेकर, असिफ भाई इनामदार, परेश वाबळे, सुरेखा लकडे, महेश तावरे, ज्ञानेश्वर खेतमाळीस आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निरीक्षक एस.पी.गोलांडे सर, मुख्याध्यापिका नीतू दुलानी मॅडम, कोरिओग्राफर सुमेध व प्रणाली गजभिये यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
प्रसंगी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी फार्मसी कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रा.प्रतीक्षा कोठारी आणि आय आय टी मुंबई येथे निवड झालेला संकेत गव्हाणे यांनी शाळेमध्ये पहिलीपासून मिळालेल्या उत्कृष्ट आणि दर्जेदार शिक्षणामुळे आज आम्ही यशस्वी ठरलो असे सांगत शाळा आणि शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.