सहकार महर्षी बापूंच्या 90 व्या जयंतीनिमित्त शिक्षण संस्थांकडून विविध स्पर्धांचे आयोजन
By : Polticalface Team ,14-01-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधात सहकार व शिक्षण महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या 19 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या 90 व्या जयंती सोहळ्यानिमित्त स्वर्गीय बापूंनी स्थापन केलेल्या श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था, तसेच तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान आदी संस्थांच्या वतीने तालुक्यातील स्वर्गीय बापूंच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या शिक्षण संस्थांतील विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा या आयोजनाबरोबरच बापूंचे कार्य यापुढेही सतत तरुण पिढीसाठी कायम स्मरणात राहावे याबाबत विद्यार्थ्यांकडून बापूंच्या कार्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही निश्चितच तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब समजली जाते या आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था व ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थांच्या सर्वच विद्यालयांकडून प्रत्येक गावांमध्ये सहकार महर्षी बापूंची प्रतिमा रथ तयार करून विद्यार्थी व शिक्षकांकडून वाजत गाजत लेझीम पथकाद्वारे शिक्षण महर्षी बापूंना आदरपूर्वक अभिवादन करण्यात येत आहे.
दरम्यान सहकार महर्षी बापूंनी श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याला नव संजीवीनी देण्यासाठी सहकार, शिक्षण, सिंचन, कृषी क्षेत्रासाठी जवळपास सहा दशके अहोरात्र परिश्रम घेऊन आपले संपूर्ण आयुष्य श्रीगोांदा तालुक्याच्या हितासाठी अखेरच्या श्वासापर्यंत समर्पित केले. अशा या आपल्या तालुक्याच्या विकासरत्न लाडक्या नेत्याला संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यातील आम जनतेकडून अभिवादन करण्यात येत आहे. निश्चितच सहकार व शिक्षण महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांनी राजकीय व सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून खऱ्या अर्थाने त्या प्रत्येक घटकातील व्यक्तीला आपले जीवन सुसह्य आनंदी व कष्टाला दाम मिळवण्यासाठी बापूंनी श्रीगोंदा सारख्या या दुष्काळी तालुक्याला छोटा खाजगी कारखाना सहकारी मित्रांना बरोबर घेऊन सहकार तत्त्वावर उभारला. आणि तेथूनच खऱ्या अर्थाने श्रीगोंदा तालुक्याला विकासाची चालना मिळाली. या सहकारी साखर कारखान्याची उभारणीनंतर या तालुक्यातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळाले पाहिजे यासाठी सहकार महर्षी बापूंनी शासन दरबारी अहोरात्र अथक असे परिश्रम घेऊन प्रथम घोड धरणाचे पाणी मोठ्या संघर्षातून मिळवत असताना पुढे विसापूर येथे 1956 रोजी मोरारजी देसाई यांच्या उपस्थितीत विशाल कुकडी परिषद घेऊन कुकडीचा पाणी प्रश्न सोडवला. या दोन्हीही धरणाचे पाणी आज सहकार महर्षी बापूंच्या संघर्ष व योगदानातूनच श्रीगोंदा व शेजारील कर्जत तालुक्याला मिळते आहे. बापूंच्या योगदानामुळेच श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही.आजही अनेक वयोवृद्ध शेतकरी बापूंच्या तीव्र लढ्याची गावोगावी गाव कट्ट्यावरती प्रत्येक तरुणांना हे पटवून देत आहेत. हीच खरी बापूंना आदरांजली ठरेल
या लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी 19 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांच्या 90 व्या जयंती सोहळ्यानिमित्त खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीगोंदा फॅक्टरी येथील इंदिरा गांधी विद्यानिकेतनच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले असून, प्रामुख्याने सहकार व शिक्षण महर्षी बापूंनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थांकडून बापूंच्या कार्याला उजाळा देण्यासाठी गावोगावी तीनही संस्थांचे निरीक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आदींनी विद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबवून बापूंनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान याचे जनतेला चिरकाल स्मरण व्हावे, यासाठी उत्कृष्ट नियोजन करून मोठे परिश्रम घेत आहेत. या कामी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड, ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी के लगड, तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे निरीक्षक एस पी गोलांडे हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष लक्ष ठेवून आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.