महावितरणच्या हलगर्जीपणामुळे विजेच्या शॉर्ट सर्किटने साडेआठ एकर उसावर मोठे संकट दुर्दैवाने घटना टळली

By : Polticalface Team ,14-01-2024

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे विजेच्या शॉर्ट सर्किटने साडेआठ एकर उसावर मोठे संकट दुर्दैवाने घटना टळली लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील श्रीगोंदा काष्टी रस्त्यालगत शेतीच्या सोयीसाठी वास्तव्य करणारे सौ अनुसया कल्याण कुरुमकर व निलेश कल्याण कुरुमकर यांच्या शेती गट नंबर 133 नवीन गट नंबर 131 या गटातील क्षेत्रातून महावितरण विज वाहिनी तील तारांतून शॉर्टसर्किट झाल्यामुळे तेथील उभ्या सहाय्यकर उसावर महावितरण चा हलगर्जीपणा मुळे मोठे बालंट ओढवले होते. परंतु शेतीमालक निलेश कुरुमकर व इतर ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वरील ऊसावरील संकट टळले.
मिळालेल्या माहितीनुसार लिंपणगाव येथील शेतकरी निलेश कुरुमकर यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, गेल्या तीन महिन्यापासून महावितरणच्या अधिकारी कर्मचारी वायरमन इत्यादींना उसावरून जाणाऱ्या विद्युत तारा इतरत्र हलवण्यासाठी विनंती केली. परंतु संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारची दखल न घेतल्याने अखेर शनिवारी मध्यरात्री अचानक माझ्या शेती बांधावर असणाऱ्या नारळाच्या झाडे व उसावरती विजेचे तारतून अचानक जाळाचे लोळ पडू लागले. विज पडताना आवाजही येत असताना अचानक निलेश कुरुमकर हे बाहेर आले आणि त्यांनी हा घडलेला प्रकार पाहताच तात्काळ इतर ग्रामस्थांच्या मदतीने नारळाचे झाड व ऊसाला लागलेली आग तात्काळ विझवली. अन्यथा तेथील साडेआठ एकर ऊस जळून खाक झाला असता व शेजारील राहत्या बंगल्याला देखील आग लागली असती अशी गंभीर तक्रार श्री निलेश कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान शेतकरी निलेश कुरुमकर यांनी आणखी बोलताना सांगितले की, श्रीगोंदा- काष्टी- लिंपणगाव येथील संबंधित महावितरणच्या उपअभियंतांना वेळोवेळी या घटनेची तक्रार करूनही याकडे गांभीर्यपूर्वक दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर सहाय्यक उप अभियंता श्री बाविस्कर यांनी मात्र सकाळीच संबंधित महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी पाचारण करून सदर विद्युत वाहिनीच्या तारा इतरत्र हलवल्या त्यामुळे श्री बाविस्कर यांचे निलेश कुरुमकर यांनी आभार व्यक्त केले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.