कोमल शिंगाडे यांची मंत्रालयामध्ये उपकक्ष अधिकारी म्हणून निवड
By : Polticalface Team ,16-01-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- नागवडे यांचे खंदे समर्थक राघू शिंगाडे यांची कन्या कोमल राघू शिंगाडे या विद्यार्थिनीची एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची मंत्रालयामध्ये उपकक्ष अधिकारी म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी माजी उपप्राचार्य सदाशिव उंडे प्रा भुजबळ सर डॉ कदम प्रा मोडवे सर सेवानिवृत्त मंडलाधिकारी शिंगाडे भाऊसाहेब आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ.सतीश चंद्रसूर्यवंशी यांनी कोमल शिंगाडे यांना पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
सत्कारमूर्ती कोमल शिंगाडे यांचे सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे, आदींनी अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :